पान:लंकादर्शनम्.pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१०

जवळ पैसे नव्हते परन्तु त्याबद्दल सार्जटानें घिसाघिस केली नाहीं.

 इतके विधि झाल्यावर आह्मी सीलोनमध्ये फिरण्यास मोकळे झालो. गाडी स्टेशनवर तयार होतीच तींत आह्मी जाऊन बसलो. डबा सर्व मोकळा होता व स्वच्छ होता. एकदा आह्मी आंत जाऊन पथारी टाकून निजल्यावर दुसरे दिवशी सकाळी ७ वाजतां कोलंबोला जाईपर्यंत आमच्या डब्यांत एकही पैसेंजर आला नाहीं. गाडी स्टेशनवर थांबली की केहेलगेडी ( केळी ); कुरुवा ( शहाळे ), देवातुरा (चहाचे पाणी ), बुलत (पानपट्टी) अशा आरोळ्या ऐकू येत असत.

  रात्रभर पाऊस पडत होता. थंडीही वाजत होती. मधून सहज डोकावून पाहिले तर झाडांची गर्दी दिसें. पहाटे ५ वाजता बहुतेक सर्वजण खिडकीशी बसून शोभा पाहू लागले. जिकडे तिकडे हिरवीगार भाताची शेतें होती. नारळी, पोफळी यांची गर्दी दिसे. पाण्याचे सुंदर प्रवाह जिकडे तिकडे वहात होते. आह्मी सर्वजण रुक्ष प्रदेशांतून तिकडे गेलो होतो एप्रिलमध्ये आमच्याकडे कडक उन्हाळा, जिकडे तिकडे शेतांत काळीभोर जमीन दिसावयाची आणि सीलोनमध्ये पहावे तर श्रावण महिन्या प्रमाणे वनश्री याचे आमच्या बरोबरीच्या शेतकरी बंधूस फारच आश्चर्य वाटले. आह्मी ज्या भागांतून चाललो होतो तो भाग समुद्रसपाटीपासून फारच थोडा उंच होता. रेल्वेकडेला कित्येक ठिकाणी समुद्रसपाटीपासून उंची फक्त १५ फूट आहे असे दाखविणा-या पाट्या होत्या.

 सकाळी ७-८ वाजतां कोलंबोच्या स्टेशनवर आह्मी आलों. आमचा नेहमीचा शिरस्ता म्हणजे कोणत्याही गांवीं गेल्यानंतर मुक्कामाची जागा शोधून काढावयाची अगाऊ तयारी करावयाची नाहीं. कोलंबो हैं अगदीच निराळे ठिकाण जावें कोठें ही पंचाईत पडली. निरनिराळे हॉटेलवाले आमचेकडे आले पण रोजी २-३ रु. देऊन हॉटेलांत राहण्याची आमची तयारी नव्हती. एक सिंहली माणूस सुमारे २०।२२ वयाचा आमच्याकडे