पान:लंकादर्शनम्.pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हे आम्ही पाहू लागलो. इतक्या अवर्षीत १|२ कारकून मंडळी आली. एका कारकुनाने आमची नांवें, वयें, आम्ही कोणत्या वर्गाने प्रवास करणारे इत्यादि माहीती लिहून घेतली. दुस-या कारकुनाने चहा बोलावतो असे सांगून ५ दिडकीस एक कप याप्रमाणे पैसे घेऊन चहा मागविला आम्हांस चहा पाहिजे होता म्हणून किमतीबद्दल आह्मी तक्रार न करितां पैसे दिले.

 थोडे वेळाने चहावाला चहा घेऊन आला. त्याचेजवळ चहा देण्याकरिता २|३ च भांडी होती. चहाकरितां पावडर वाईंट वापरलेली, दूध अपुरे, साखर पुरेशी घातलेली नाही अशा थाटांत चहा आला. आह्मी २०|२५ कप चहा मागविला होता. तेव्हां वाईट चहा आणल्याबद्दल आणि भांडी पुरेशी नसल्याबद्दल आम्ही रागावलो. तुम्ही काय आम्हास कुली समजतां ? आह्मी चहा घेत नाही अशी तक्रार केली. तेव्हां कारकुनाची धावपळ सुरू झाली तो कंपनीच्या ( चहा व जेवण पुरावणे हे काम स्पेन्सर आणि कंपनी या युरोपियन कंपनीकडे आहे ) युरोपियन मॅनेजरकडे गेला आणि तक्रार उत्पन्न झाल्याचे सांगू लागला. युरोपियन मॅनेजर आह्मीं बसलो होतो तेथे आला मी त्यास चहा अत्यंत वाईट आहे तुम्ही पैसे भरपर घेतले आहेत तर चांगला चहा देणे तुमचे काम होते असे म्हणालो पण त्या गृहस्थानें मुकाट्याने बोलणे ऐकून मात्र घेतले उत्तर कांहींच दिले नाहीं. दसरीकडे चहा मिळणे शक्यच नसल्यामुळे तो थंडा व बेचव चहा मंडळीनी थोडासा घेतला व बाकीचा वाया गेला. आह्मी त्याचहावाल्यास आणि कारकुनास बोलून बोलून रंजीस आणिले.

 नंतर कारकनाने किती लोकांचे जेवण तयार करूं ह्मणून विचारले. आह्मी त्यास सांगितले की, तुम्ही अत्यंत वाईट चहा दिलांत तेव्हा आम्ही यथे जेवणार नाहीं. उपाशीच आम्ही प्रवास करू असे सांगितले. जेवणाची यवस्था चांगली करू, पुढे कोठेही जेवणाची सोय नाही. तुमच्या