पान:लंकादर्शनम्.pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३

असलेल्या दागिन्यांची मोजदाद केली व वेळ पडल्यास दागिने मोडून पैसे भरावेत असा निश्चय केला.

 दुसरे दिवशी सकाळी जेवणे आटोपून आह्मी आपलें सामान व मोटारी आम्हास रामनड येथे भेटलेल्या तरुणाचे स्वाधीन करून सुमारे ११ वाजतां स्टेशनवर गेलो. तेथून सर्व मंडळीस रामेश्वरी पाठवून मी व श्री. वाघ असे दोघेजण मंडपम् येथे गेलो. तेथे मुख्य ऑफिसरला भेटून आह्मी परवानगीबद्दल व डिपाझिटबद्दल गोष्ट काढली. सुपरिंटेंडेंट फारच सज्जन होते त्यांनी आमच्याशी अगदी मोकळे मनाने बोलून आह्मांस परवानगी देण्याचे कबूल केले व १०० रु. डिपोझिट द्याल कां म्हणून विचारिले. आम्ही शंभरपेक्षा जास्त देऊ शकू असे म्हणून २५० रु. अनामत ठेवण्याचे कबूल केले व दुसरे दिवशी सकाळी येण्याचे ठरवून परत रामेश्वरीं दपारी चार वाजतां जाऊन पोहोंचलो.

 मंडपम् येथे सीलोन सरकारचा इमिग्रेशन कॅप आहे. तेथे उतरून प्रत्येक उतारूस आपला पास दाखवून प्रकृति चांगली असल्याबद्दलचा डॉक्टरचा पास घ्यावा लागतो. येथे कारंटाईन आहे. सीलोनमध्ये जाण्या. पूर्वी येथे १० दिवस कारंटाईनमध्ये रहावे लागते. ज्या लोकांच्या जवळ सीलोनमधील रहिवाशांकडून आलेले पास असतील त्यांस क्वारंटाईनमध्ये रहावे लागत नाही, पण सीलोनमध्ये गेल्यावर दररोज तेथें मेडिकल ऑफिसर समोर हजर रहावे लागते व आपण निरोगी आहों असे बद्दल दाखला घ्यावा लागतो. ही पद्धति ज्यांना सहज ४।६ दिवस सीलोनमध्ये जावयाचे असेल त्यांना तापदायक अशी आहे. या नियमाचे जर उल्लंघन झाले म्हणजे सीलोनमध्ये गेल्यानंतर डॉक्टर पुढे तपासणीस हजर राहिले नाहीं तर एक हजार रुपये पावेतों दंड होतो.

 आम्ही सकाळीच ( म्हणजे रामेश्वराहून पहाटे निघून ) मंडपम येथे गेलो. तेथे गेल्यावर मुखमार्जनादि विधि आटोपलें चहा मिळतो की नाहीं