पान:लंकादर्शनम्.pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



बरोबरच्या मुलांचे कसे होईल इत्यादि नाना प्रकारच्या गोष्टी बोलून जेवणाची तिकिटे घेण्याबद्दल कारकून आग्रह करू लागला. आह्मी आपले पाहिले बोलणें कायमच ठेवले. शेवटी त्याने दुस-या एका गृहस्थास बोलाविले वे आह्मांस जेवणाची तिकिटे घेण्याबद्दल आग्रह पुढे चालूच ठेविला. आह्मी सुमारे २ तासपर्यंत या ह्मणण्याकडे लक्ष्य दिले नाही. कारकून १५|२० मिनिटांनी पुन्हां येई. भाजी चांगली करितो. तुह्माकरितां कच्चा तांदूळ आपल्या इकडे जसा गिरणीतून सडून येतो तसा घेतो असेही सांगितले. कारकून अनेकवार आल्यावर आम्ही १५ जेवणे तयार करण्यास सांगितले. जेवणाचा दर प्रत्येक वेळेस ५ आणेप्रमाणे होता. लहान मुलांसही येथे ५ आणे आकारण्याची चाल आहे असे दिसते पण दोन मुलांस ५ आणे आकारण्याचे कबूल केल्यावर मुलांचीही तिकिटेंही आह्मी काढली. कदाचित् मुलांचा ५ आणे आकार घेतला जातो अशी थापही आभास दिली असावी.

 सुमारे ८-८॥ वाजतां डाक्टर येऊन तपासणीस सुरवात झाली. तपासणीस देवी आल्यांत की नाहीं एबढेच सामान्यतः तपासीत. मी स्वतः डाक्टरचे जवळ बराच वेळ होतो पण कोणी क्षयी आहे की काय हे पहाण्याकरितां टीथास्कोपचा त्याने कधीच उपयोग गेला नाहीं. उपदंशाबद्दलही कांहींच चौकशी होत नाहींसे दिसले. डाक्टरने चौकशी करून सर्व लोकांस पटांगणांल जाण्यास सांगितले. तेथे सर्व लोकांचे कपडे घेऊन वाफ . देण्याकरितां गोळे केले वे कपडे निर्जन्तुक होण्याकरितां यंत्रांत जाऊन बसले. मंडपम् कॅपमध्ये रोगजंतू फक्त कापसाच्या कपड्यांत राहतात. असे मला आढळून आले. कारण डाक्टर लोकांनी कापसाचे कपडे तेवढे नेलें, लोकरीचे व रेशमाचे मात्र आमचे जवळून राहू दिले. माझ्याजवळ लोकरीचा भला दांडगा केसाळ कोट होता. रोज जन्तूंनी जर त्यांत रहावयाचें मनांत आणिले तर नाना त-हेच्या रोगांचे कोट्यवध जन्तूना सुखाने राहतां येर्यल असा माझा