पान:लंकादर्शनम्.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४

ते सायंकाळी ६ पर्यंत खुलें असतें. रविवारी मात्र दुपारी ३ ते ६ पर्यंतच खुलें असते. त्यांत निरनिराळ्या काळच्या बुद्धाच्या मूर्ति, सिंहली लोकांचे अलंकार, रुप्याचे व हत्तिदंति काम, वगैरे नानाविध पदार्थ आहेत. तसेच एक प्राणि संग्रहालय आहे तेथे बरेच प्राणी आहेत, मुंबई व मद्रास येथील संग्रहांचे मानाने हें फारच कमी दर्जाचे आहे. येथे सीलोनमध्ये सापडणारा 'बोवा' नावाचा एक सर्प आहे, त्याचे वजन १८७ पौंड असून लांबी २७ फूट आहे.

 कोलंबो येथे मोटार सर्व्हिसने एका भागांतून दुसन्या भागांत जाता येते. मोटारीचे दर सरकारने आंखुन दिलेले आहेत. दिवसापेक्षां रात्री १० नंतर भाडे अधिक पडते. पुणे, मुंबई शहरासारखे येथे टांगे नाहींत. जपानमधील रिक्षा मात्र शहरभर मिळतात. रिक्षेत एका माणसासच बसता येते. शिवाय हें वाहन माणसाने ओढिले जाणारे असल्यामुळे २|३ मैलाच्या प्रवासास थोडेसे निरुपयोगीच पडते.

 बैलगाड्या फारच मोठ्या असतात. त्यांच्या वरच्या तट्यावर बहुधा माडाची पाने असतात, पाण्याचे तुषार गाडींत येऊ नयेत ह्मणून पुढील आणि मागील बाजूस तट्याचे टोक बरेंच पुढे आणिलेले असते.

 कोलंबो येथे गोड्या पाण्याचे मोठे तळे आहे. त्याचे क्षेत्रफळ ४१६ एकर आहे. तळ्याच्या कांठाला निरनिराळ्या प्रकारची ताडांची व माडांची झाडे आहेत. या तळ्यांत मध्यभागी एक लहानसे बेट आहे. डच लोक 'कैद्यांनी पळून जाऊ नये' म्हणून त्यांस रात्री येथे ठेवीत असत व यावरून त्या बेटास गुलामां बेट असें ह्मणतात. सध्या ते बेट लहानसा पूल बांधून जमीनीस जोडले आहे.

 केलनी नर्दीच्या कांठीं बुद्धाचे प्राचीन असे "केलनी" नांवाचे मंदीर आहे या देवळाचा जीर्णोद्धार १३०१ मध्ये झाला. कोलंबोपासून हे देऊळ अगदी जवळ आहे. तेथे रेल्वेने किंवा मोटारने जाता येते.