पान:लंकादर्शनम्.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१०३

वस्ति थोडी दाट आहे पण असा भाग थोडा आहे. रस्त्यांच्या कडेला नानाप्रकारची झाडे आहेत त्यामुळे पुष्कळशा रस्त्यांवरून सावलीतून जातां येते. पुष्कळशा घराभोंवतीं मोकळी जागा असून त्यांत पोफळी, केळी, नारळी वगैरेंची झाडे आहेत.

 या ठिकाणी नाना धर्माचे लोक आहेत. कोलंबो हे मोठे बंदर असल्यामुळे नानादेशचे लोक येथे प्रत्यहीं येत असतात. शहर अगदी पाश्चात्य पद्धतीचे दिसते. समुद्राच्या पूर्व किनाऱ्यास गॅलिफेस हॉटेल नांवाचे प्रसिद्ध हॉटेल आहे. सीलोनचे सेक्रेटेरियेट बिल्डींगही तेथे जवळच आहे. बंदराच्या पश्चिम बाजूस 'सी-रोड' (एका भागाचें नांव) आहे तेथे केवळ शाकाहारी लोकांची रहाण्याची व जेवणाची सोय असणारी हाटेलें आहेत.

 बंदर दाक्षण वाजूस आहे व बंदराचे दक्षिणेस डच लोकांनी बांधलेला किल्ला होता. कोलंबो येथे अरमार आणि फौज आहे. बंदरापासून उत्तरेकडे जाणाऱ्या मोठ्या रस्त्यावर नानातऱ्हेची दुकाने आहेत. कांहीं दुकानांतून सीलोनमध्ये सांपडणाऱ्या रत्नांचे निरनिराळे दागिने व सुटी रत्ने विक्रीकरितां ठेविलेली दिसतात. रस्त्यांतून रत्नांची विक्री करणारेही फिरत असतात. रत्नांची परीक्षा नसणारे परकी लोक आपला खिसा रिता करून परत जाणारे व नंतर पश्चात्ताप पावणारे मधून मधून दिसतात.

 शहराचा विस्तार सुमारे ८|१० मैल लांबीचा आहे. स्टेशनपासून सुमारे ७ मैलांवर 'वेलावटि' ह्मणून एक भाग आहे तेथे कापडाची एक गिरणी आहे. प्रत्येक वाण्याच्या दुकानांत किंवा धान्याच्या दुकानांत सुकी मासळी विक्रीकरितां असतेच. त्यामुळे शाकाहारी माणसास जरा कसेसेच वाटते. सिंहली लोक विडा खाणारे वस्ताद आहेत पण त्यांचा विडा काता शिवाय तयार केलेला असतो व सुपारी बहुधा ओली असते. लहान लहान दुकानांतून मोठमोठाले केळीचे घड विक्रीकरितां टांगून ठेविलेले दिसतात. कोलंबो येथे एक म्यूझियन आहे. हे रोज सकाळी १०