पान:लंकादर्शनम्.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०५

पौर्णिमेच्या दिवशी ( बुद्धलोक पौर्णिमेस पोया म्हणतात ) हजारो लोक हातांत फळे व फुले घेऊन या देवळाकडे जातांना दिसतात. या देवळांत बुद्धाची प्रचडमूर्ति ( आडवी ) आहे.

 कोलंबो पासून सुमारे ९ मैलावर "माऊंट लॅव्हिनिया" नांवाची समुद्रकांठीं एक सुंदर टेकडी आहे. तेथून समुद्राचा व एकंदर सृष्टिसौंदर्याचा फारच नामी देखावा दिसतो. कोलंबोस येणारे प्रवासी बहुधा येथे गेल्योशिवाय राहात नाहींत.

 गॅलिफेस हाटेल जवळील पटांगण होणजे मुंबईची ‘चौपाटी' आहे असे म्हणण्यास हरकत नाहीं. रमजान सारख्या सणाचे वेळी या ठिकाणी अफगाण व पठाण लोकांचे नाच होतात. तसेच एप्रिल तेरालाही (सिंहली लोकांचे नवीन वर्ष या दिवशी सुरू होते) हे पटांगण उत्सवानें खुलून गेलेले दिसते.

 ग्रँट ओरिएंटल हाटेलच्या शेजारी "मकन मार्कर" च्या इमारतीत खालचा एक सबंध मजला रत्नांकारितां राखून ठेविलेला आहे. व त्यांत नानातऱ्हेची रत्नें व रत्नांचे दागिने ठेविलेले आहेत. तेथील रत्ने वे दागिने कोलंबोला गेल्यानंतर पाहिल्या शिवाय राहू नये. हा रत्नांचा संग्रह विक्रीकरितां नाहीं.

 ग्रँट ओरिएंटल हाटेलजवळ 'अबदुल गफूर जव्हेरी' यांची एक इमारत आहे. या इमारतींतही नानाप्रकारची रत्ने व मोत्ये आहेत. हा संग्रह फुकट पहाण्यास मिळतो. या ठिकाणी मालाची विक्रीही कारतात.

 कोटॅज इंडस्ट्रीज सोसायटीचे एक दुकान आहे तेथे सीलोनी पद्धतीच्या नावाप्रकारच्या वस्तु मिळतात. हे दुकान हाटेलमध्येच आहे.

कॅंडी

 समुद्र सपाटीपासून १७६० फूट उंचीवर एका रम्य अशा दरींत सुमारे ३५ हजार वस्तीचें हें गांव वसलेले आहे. भोवताली सर्वत्र उत्तम