पान:लंकादर्शनम्.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



९०

लूट ५ महिने चालली होती. दक्षिण हिंदुस्थान हा रत्नांनी, मोत्यांनी व सुवर्णांनी खचून भरलेला मुलूख पण तेथील अनेक लोकांना केवळ सारभाता करितां मळेवाल्यांची गुलामगिरी पत्करावी लागली आहे, व याचे कारण एकच की या लोकांनी बलोपासना केली नाहीं.

 असो दक्षिण हिंदुस्थानाप्रमाणेच सीलोन हे अत्यंत प्राचीन असल्यामुळे या बेटांत रत्नपुरंच्या जवळ शेकडो लहान मोठ्या खाणी आहेत; त्यांत हिरे, माणके, पांच, गोमेद इत्यादि नाना तऱ्हेचीं रत्नें सांपडतात. सॅफायर नांवाचे रत्न विशेषतः फार सांपडते. याचा रंग शुभ्र, पिवळा, हिरवा व गुलाबी असतो. पिवळ्या खड्याच्या किमती सामान्य माणसाला परवडण्याइतक्या कमी असतात. माणिक अगदी रक्तासारखें लाल असते. अलीकडे सीलोनमध्ये माणिक कमी सापडू लागले असून गेल्या ५|६ वर्षांत पूर्वी पेक्षा जास्त सुंदर आणि किंमतवान असे सॅफायर फार सांपडते. स्टार सॅफायर म्हणून जी जात आहे त्या जातीच्या खड्यावर ताऱ्याची आकृति दिसते. १९०७ सालीं जगांतील अत्यंत मोठा असा ४६६ कॅरट वजनाचा सॅफायर (कापून पैलू पाडल्यानंतरचे वजन) सांपडला. नीळ नांवाचें सीलोनी रत्न फारच सुंदर असते व त्याला अमेरिकेतून फार मागणी येते.

 कृष्णानदीच्या मुखाजवळील प्रदेश व सीलोन येथूनच पूर्वी सर्व जगास हिरे पुरविले जात असत. परंतु १७२५ मध्ये ब्राझील देशांत रत्नांच्या खाणी सांपडल्या आणि सांप्रत ड्युटोइटस् पान, डी. बेअर्स, किंबर्लें, बेसल्टन, न्यू प्रिमियर या खाणींतून हिरे काढण्याचे काम चालू आहे. लंडन सिंडिकेट नांवाच्या संस्थेने सर्वजगांतील खाणीत सापडणारे हिरे खरेदी करण्याचा मक्ताच घेतला आहे. यामुळे वाटेलत्या व्यापाऱ्याला हिऱ्याच्या खरेदीविक्रींत लुडबुड करितां येत नाहीं.