पान:लंकादर्शनम्.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



८९

आफ्रिकेचा दक्षिण भाग वं हिंदुस्थान आणि हिंदुस्थान व आस्ट्रेलिया ही एकमेकांस जोडलेली होती; त्यांमध्ये समुद्र नव्हता असा शास्त्रज्ञांचा तर्क आहे.

 सन १६५० च्या सुमारास हैदराबाद (निजाम) हे हिरेमाणकांच्या व्यापाराचे आदिस्थान होते. सर्व पृथ्वीवर एवढा रत्नांचा व्यापार कोठेही नव्हता. मीरजुम्ला नांवाचा एक सामान्य मुसलमान गृहस्थ १६३० मध्ये हिंदुस्थानांत आला आणि रत्नांचा व्यापार करू लागला. या व्यापारांत त्याला अतोनात नफा झाला. पुढे त्याला गोवळकोंड्याच्या बादशहाने आपला प्रधान नेमिले. त्यानंतर मिरजुम्लाने अनेक मोठमोठी देवालयें लुटून रत्ने व सुवर्ण यांचा संचय केला. शिवाय हिव्याच्या च सोन्याच्या नवीन खाणी शोधून व जुन्यांमध्ये नवीन काम करवून त्याने अपरंपार संपत्ति मिळविली, गोवळकोंड्याच्या खाणी म्हणून ज्या खाणी होत्या त्या कृष्णा नदीच्या काठीं कर्नूल वे अनंतपूर या प्रांतांत होत्या व मुख्यतः वज्रकरूर येथे त्या विशेष चांगल्या होत्या. रामरायाच्या (विजयनगरचा राजा) खास घोड्याचा तुरा हिरे व मोत्ये यांचा होता व त्यांत कोंबडीच्या अंड्याएवढा एक हिरा होता. कोहिनूर १६५६ सालीं कृष्णेच्या कांठीं कोलूर येथे सांपडला, त्यावेळी त्याचे वजन ७५६ कॅरट होते. हिरे, मोत्यें, पांचू, माणकें वगैरे दक्षिणहिंदुस्थानांत अतोनात असत. विजयनगरच्या साम्राज्यांत जे जे प्रवासी येऊन गेले ते ते ही संपत्ति पाहून आश्चर्यचकित झाले व त्यांनी लिहून ठेविलेल्या हकीकतात रत्नांची पुष्कळ वर्णने आली आहेत.

 १००८-१००९ मध्ये महमदानें नगरकोट येथील स्वारति २० मण वजनाचे मोत्यें व हिरे नेले व १३१० मध्ये अल्लाउदीन यानें रामेश्वरावर स्वारी करून ६१२ हत्ती २०००० घोडे ९६००० मण सोने व हजारो मोत्यें वे हिरे नेले. विजयानगरच्या लुटींत तर सोने व रत्ने किती परकीयांच्या हाती पडली असतील याची गणतीच नाही. या शहराची