पान:लंकादर्शनम्.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



८५

हिंदुस्थनांतूनच नेलेली होती.

 सीलोनमध्ये खलाशी लोक बरीच रात्र असतांना आपल्या होड्या घेऊन निघतात व सूर्योदयाचे वेळीं, समुद्रात बुड्या मारून शिंपले गोळा करू लागतात. पानबुडे नाकांत पाणी जाऊं नये ह्मणून नाकाला कांहीं तरी पदार्थ बांधतांत, तळाशी लवकर जावे म्हणून एखादा दगडही बरोबर घेतात. समुद्राच्या तळाशी गेल्यावर जेवढे शिंपले गोळा करवतील तेवढे गोळा केल्यानंतर दम निघेनासा झाला म्हणजे आपल्या कमरेस असलेल्या दोरास हिसका देतात व ही खूण मिळतांच बोटीवरील लोक पाणबुड्यास वर काढून घेतात. याप्रमाणे दुपार पर्यंत काम चालते. नंतर बोटी किनाऱ्यास येतात व शिपल्यांची निवड करून ते शिंपले मोती काढण्याकरिता कारागिराकडे दिले जातात. शिंपल्यांतून मोती काढण्यास फार कुशलता लागते. जरा धक्का लागला की, मोतीं बिघडते. मोती बाहेर काढल्यानंतर आकारमान व तेज यावरून मोत्यांचे वर्गीकरण करतात. सीलोनमध्ये मोती काढण्याच्या कामास मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांत सुरवात होते व हे काम सुमारे दीड महिना चालते. या दीड दोन महिन्याच्या अवर्धीत अनेक व्यापारी सीलोनमध्ये जातात व मोत्यांचा व्यापार करितात.

 मोती तयार करणाच्या प्राण्यांना कालव असे म्हणतात. या प्राण्यांच्या शारिरांतून एक प्रकारचा रस बाहेर पडतो किंवा त्यांना तो रस बाहेर टाकता येतो. कालव शिंपल्यांत असतांना जर एखादा प्राणी त्यांत शिरला किंवा एखादा वाळूचा बारीक कण आंत आला तर त्या प्राण्यावर किंवा कणावर आपल्या अंगांतून निघणाऱ्या रसाचा लेप देण्यास कालव सुरवात करतो व एकामागून एक दिलेल्या लेपांना घट्टपणा आला म्हणजे मोती तयार होते. कांद्यांत जसे एकावर एक पापुद्रे असतात तसे खऱ्या मोत्यांत एकावर एक असे पातळ थर असतात. कलचर्ड मोती एकाच