पान:लंकादर्शनम्.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४

नाहीं. तेव्हां सीलोनमध्ये ज्या भागांत शंभर शंभर हत्तींचे कळप फिरतात तेथील अरण्ये किती दाट असतील याची कल्पना हत्तीच्या आहारावरून सहज येईल.

मोतीं.

 सीलोनच्या वायव्य दिशेस किनाऱ्यांपासून सुमारे २० मैलांवर मोती सांपडतात. या ठिकाणीं अगदी प्रथमतः मोती केव्हा काढण्यांत आले तें इतिहासाभावीं सांगणे कठीण आहे. उत्तरहिंदुस्थानांतून राजपुत्र विजय इ. सनापूर्वी ५४३ साली सीलोनमध्ये गेला. सीलोनमध्ये गेल्यानंतर त्याने आपल्या सासऱ्यास सुमारे दोन लक्ष किंमतीचे मोती व शंख पाठविले होते असा उल्लेख आहे. यावरून इ. स. पूर्वी कित्येक वर्षांपासून सीलोन हे मोत्याकरित्यं प्रसिद्ध होते असे दिसते. सन १९०६ साली लंडन मधील एका कंपनीला सीलोनमध्ये मोती काढण्याचा मक्ता मिळाला. पण पुढे कित्येक वर्षांपर्यंत मोत्यांच्या कालवांनीं मोती तयारच केले नाहींत. सन १९०६ पासून १९२४ पर्यंत मोती करणारे कालव कोठे गेले होते की काय कोण जाणे. सन १९२४ नंतर पुन्हां मोती काढण्याचे काम सुरू झाले. सध्या मोती काढण्याचे ठिकाण (फिशरी) डॉ. पिअरसन "डिरेक्टर आफ कोलंबो म्यूझियम अँड मराइन बॉयालाजिस्ट" यांच्या ताब्यात आहे. किनाऱ्याजवळ मोत्याच्या व्यापारामुळे 'मरिचचुकडी' नांवाचे मोठे गांवच वसलें आहें.

 प्राचीन काळी सीलोन व इराणचे आखात येथूनच मुख्यतः सर्व जगास मोत्यांचा पुरवठा होत असे. रोमन आणि ग्रीक साम्राज्याचे भरभराटीत अनेक पाश्चात्य व्यापारी मोत्यांकरितां हिंदुस्थानांत येत व मोती घेऊन जात. टालेमीची बायको, प्रख्यात विलासी राणी "क्लिओपाट्रा" एका सुंदर जहाजांत बसून अँटनीला भेटावयास सिसिली येथे गेली होती, त्यावेळी तिच्या कर्णभूषणांत अत्यंत मौल्यवान् व तेजस्वी अशी मोतीं होती ती