पान:लंकादर्शनम्.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



८३

 हत्तीला उन्हाचा ताप सहन होत नाही म्हणून थंड वेळच हत्तींचे कळय अरण्यांतून भटकतात. हत्तीला गोडफळे व गूळ फार आवडतो. पायमारा ताडाची फळे पिकली म्हणजे जाफनाकडे हत्तींचे कळप जातात हे मागें सांगितलेच आहे. हत्तीला पोहण्याची आवड फार; त्यामुळे सीलोनमध्ये तलावांत किंवा नद्यांत रानटी हत्ती पोहण्यास आलेले दृष्टीस पडतात. हत्ती पाण्यांत तासच तास पोहतो. सन १९०५ साली बंकिया नांवाचा बडोद्याचा हत्ती एका तळ्यांत ३६ तास पोहत होता. रानटी हत्तीमध्यें भयंकर यद्धे होतात, व त्यावेळी ते सोंडेने एकमेकांस जोराने रट्टे मारतात, कित्येकद हे युद्ध दोन दोन दिवस चालते व त्यांत त्यांचे सुळे मोडून पडतात. हत्ती बलाढ्य असून भित्रा आहे, कित्येकदा रानडुकरांना सुद्धा भिऊन पळून जातो. हत्तीचे घ्राणेंद्रिय इतकें तीक्ष्ण असतें कीं, ३ मैलावरून त्यास आपल्या शत्रूचा वास येतो. हत्तीण २४ महिन्यांनीं विते. हत्तीची आयुर्मयदा १२५ ते १५० वर्षांची आहे.

 सीलोनमध्ये हत्ती चाललेले असतांना शिकारीलोक मागून मोठाले दोर त्यांच्या मागील पायांत टाकून त्यांना अडकवितात व पकडतात. पाळीव हत्तींचाही रानटी हत्ती पकडण्याच्याकामी उपयोग करतात. कित्येकदां अरण्यांत मोठाले खड्डे करून ते पानपाचोळ्यांनीं झांकून टाकतात व त्यावरून जातांना हत्ती आंत पडले म्हणजे त्यांना पकडतात.

 बडोद्यास पहिल्या प्रतीच्या हत्तीस पुढील प्रमाणे खाणे देतात.

गव्हाचे पीठ ५० पौंड मीठ °||° पौंड
तूप ३ ||° " मसाला १ "
गूळ ३ ||° " गवत ३०० "

 यावरून हत्तीला दररोज ५ मणापेक्षां जास्त खावयास लागते असे दिसून येईल. जंगलांत रानटी हत्तींचे कळप फिरतांना, दररोज प्रत्येक हत्ती ७|८ मण वजनाचे गवत खाऊन फस्त करतो व पायाखाली किती तुडवितो व वाटेंत किती झाडे सोंडेत धरून मोडून टाकतो याची तर गणतीच