पान:लंकादर्शनम्.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



८२

तरी लवकर बाजूला हालत नाहींत. कोलंबोहून कॅंडीस जाताना आम्हांस वाटेत अनेक हत्ती दिसले. हे हत्ती तेथील लोकांनी कामाकरितां पाळलेले होते. महाराष्ट्रांत बैल सर्वत्र आहे. तेव्हां "बैलाचा गाडा" किंवा "लांकडी बैल" हे लहान मुलांचे सर्व सामान्य खेळणे झाले आहे. त्याप्रमाणे लांकडी हत्ती हें सीलोन मधील लहान मुलांचे खेळणे आहे. कोलंबो येथे अनेक दुकानांतून लहान मोठे हत्ती विक्रीस ठेविलेले आढळतात.

 व्हेलखेरीज इतर सर्व प्राण्यांपेक्षां हत्ती मोठा असतो. पूर्ण वाढ झालेल्या हत्तीचे वजन ६|| टन म्हणजे १८२ मण असते. सीलोन मधील हत्ती १० फूट उंच असतो. आफ्रिकन हत्ती १४ फूट उंच असतो. सीलोनमध्ये नराला मात्र सुळे असतात. आफ्रिकेंत नर आणि मादी या दोहोंसही सुळे असतात. सुळ्यांसच हस्तिदंत म्हणतात. हत्तचे इतर दांत किंवा हाडे यांचा हस्तिदंतांत समावेश होत नाहीं. सीलोनमधील हास्तदंत जुना झाला म्हणजे पिवळा होतो, आफ्रिकन हस्तिदन्ताचा रंग वापराने बदलत नाहीं. अद्यापही सीलोनधून हस्तिदंताची बरीच निर्गत होते परन्तु त्याला पूर्वी इतका भाव येत नाही. याचे कारण असे की, प्रस्तुतकाळीं, सैबेरियांतून हस्तिदंताचा फार मोठा पुरवठा होतो. प्राचीनकाळी सैबेरियांत फार मोठाली अरण्यें होती व त्यांत मोठाले हत्तींचे व हत्तीच्या जातींच्या प्राण्यांचे कळप होते. पुढे जेव्हां भूपृष्ठांत भूकंपादिकांनीं बदल झाला त्यावेळीं अरण्यें व त्यांतील हत्तींचे कळपही जमीनीत गाडले गेले. सध्यां या गाडलेल्या हत्तींचे दांत उकरून काढून बाजारात विक्रीस पाठविले जातात, हस्तिदंताचा खपही फारच मोठा आहे. शेफील्ड येथील चाकू काव्याच्या एका कारखान्यांत दरसाल ४६००० हजार हस्तिदंताच्या जोड्या शस्त्रांच्या मुठी करितां खपतात. चांगल्या जोडीचे वजन सुमारे १४० पौंड म्हणजे ७० शेर भरते. १८७४ साली १८८ पौंडाचा एकच दांत लंडन येथे विकला होता.