पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/५६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कलामाध्यमातून आस्वादक्षमता व वृत्तीघडणीचे शिक्षण मिळत असते. ज्या गुणांची, मूल्यांची अपेक्षा केली जाते, त्यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्याचे काम अभिव्यक्ती विकसनाच्या उपक्रमातून होईल. अभिव्यक्तीच्या विविध माध्यमांचा शिक्षणात एखाद्या मार्गदर्शकासारखा उपयोग होतो. संगीत, चित्रकला, नाट्य, विविध हस्तकला या विविध कलाविषयांतून सौंदर्यदृष्टी, एकाग्रता, नवनिर्मिती, उत्कृष्टता, नेटकेपणा ही संस्कारबीजे विकसित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तनुमनात रुजवली जातात. म्हणूनच म्हणावे वाटते,
  "करू देत सुरांशी मैत्री,
  झंकारू दे तारा वीणेच्या,
  बोल उमटू दे तालामध्ये,
  रंगरेषांचे हितगुज,
  प्रतिभेची अक्षरफुले उमलू दे काव्यात,
  निर्मिती-कृती होवो अनुभवांची
  अभिव्यक्ती प्रत्येक हृदयात !"
(५०)रूप पालटू शिक्षणाचे