पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/४९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अभिव्यक्तीच्या या व्यापक स्वरूपामुळेच, शिक्षणात त्याचा योग्य समावेश करण्याच्या हेतूने १९९०-९१ या शैक्षणिक वर्षापासून 'ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे' येथे अभिव्यक्तीची विविध माध्यमे उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली.
सातवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कार्यपद्धती
 प्रतिसप्ताह २ तासिकांची (१ ता. ३० मि.) योजना वेळापत्रकात केली. या तासांना विद्यार्थी वर्गश: किंवा पथकश: एकत्र न बसता, त्यांनी निवडलेल्या अभिव्यक्तीच्या उपक्रमानुसार एकत्र बसतात.
 विविध अभिव्यक्तींची माहिती प्रथम विद्यार्थ्यांना दिली जाते. त्यानंतर आपापल्या पालकांशी बोलून विद्यार्थी आपली निवड पक्की करतात.
अभिव्यक्तीच्या पुढील विषयांचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते.
 १. इंग्रजी, हिंदी, मराठी या भाषांमधून विविध वाङ्मय प्रकारांचे लेखन.
 २. इंग्रजी, हिंदी, मराठी या भाषांमधून नाट्य, वक्तृत्व, गाणी सादर करणे.
 ३. प्रसंगनाट्य, पथनाट्य लिहिणे, सादर करणे.
 ४. शास्त्रीय भाषेत, शास्त्रीय विषयावर परिसंवाद करणे.
 ५. चित्रकला व सुंदर कलात्मक हस्ताक्षर
 ६. भूमिती-शास्त्राधिष्ठित विविध प्रतिकृती बनविणे.
 ७. सुगम व शास्त्रीय संगीत
 ८. हस्तकला, कृत्रिम फुले, खेळणी, बाटीक प्रिंटिंग, बांधणी इ.
 ९. शिल्पकला, सिरॅमिक्स्
 १०. फलक लेखन
 ११. इलेक्ट्रॉनिक्समधील विविध उपकरणे तयार करणे व दुरुस्त करणे.
 १२. संगणकावर खेळ व प्रोग्रॅम्स तयार करणे.
 १३. विविध खाद्यपदार्थ
 १४. नृत्य
 १५. गृहसुशोभन
 १६. शिवणकला
अभिव्यक्ती तासिकांच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप
 अभ्यासक्रम सत्राच्या प्रारंभीच ठरविला जातो. उदा. संगीत, वादनात विविध रागांचा परिचय, चाली, बंदिशी तयार करणे, वैयक्तिक व समूहाने गायन करणे, गायक व त्यांच्या शैलींची वैशिष्ट्ये असे स्वरूप असते. नाट्य अभिव्यक्तीत, विविध

रूप पालटू शिक्षणाचे(४३)