नाट्य खेळांद्वारे निरीक्षण, समयसूचकता, अभिनय, वेळेचे भान इ. प्रशिक्षण दिले
जाते. प्रतिभाशाली लेखनात साधे साधे लेखन विषय (उदा. खुर्ची, चेहरे मोहरे,
कॅलेंडर, चिंटू येता घरा) दिले जातात. तसेच स्थान, घटना, पात्रे सांगून कथा रचना
करणे, कविता लिहिणे, शब्दांचे खेळ करणे असे स्वरूप असते. चित्रकला विषयात
रूप, रंग, रेषांपासून प्रारंभ करून डिझाइन, निसर्ग, स्थिरवस्तू चित्रण, मनुष्याकृती
अशा चित्रणांपर्यंत मार्गदर्शन केले जाते.
अभिव्यक्ती शिक्षणाचा उपयोग विद्यार्थी कसा करतात ?
अभिव्यक्ती विकसन तासिका झाल्यावर विद्यार्थी सर्व विसरतात का ? त्या
शिक्षणाचा कसा उपयोग केला जातो ? दैनंदिन जीवनात त्यांची अभिव्यक्ती कशी
असते ? असे प्रश्न विचारात घेतले तर काय उत्तर मिळते ?
अभिव्यक्ती विकसन तासिकांमध्ये शिकलेली कौशल्ये शाळेतील उपक्रम, विविध
स्पर्धा, घरगुती समारंभ अशा वेळी विद्यार्थी वापरतात. 'गणेशोत्सव' हा शाळेतील
एक मुख्य सांस्कृतिक उपक्रम असतो. या समारंभात अभिव्यक्तीची संधी विद्यार्थी
घेतात. गणेशमूर्तीभोवती करण्याची सजावट - यात चित्रकला, हस्तकला
अभिव्यक्तीचे विद्यार्थि-विद्यार्थिनी विविध फुले, हार, पताका, थर्मोकोल
कार्डशीटच्या साहाय्याने शुभचिह्ने तयार करतात. भौमितिक प्रतिकृती तयार केल्या
जातात. रांगोळीचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी रांगोळी, गालिचे काढून प्रसंगाचे मांगल्य
वाढवितात. गणेश उपासना, आरती, पद्ये यांसाठी संगीत-वादनाचा गट सज्ज असतो.
मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यासाठी नृत्य, नाट्य अभिव्यक्तीचे विद्यार्थी पुढे
येतात.
गेली २ वर्षे नागरी वस्त्या व ग्रामीण भागात गणेशोत्सवामध्ये जे रंजन-बोधनाचे
कार्यक्रम विद्यार्थी सादर करतात, त्यासाठी प्रतिभाशाली लेखन व नाट्य
अभिव्यक्तीच्या विद्यार्थ्यांनी प्रसंग, पथनाट्ये लिहिली. विविध भागांत लावण्यासाठी
करण्याची पोस्टर्स, भित्तीपत्रके लिहिण्याचे काम हस्ताक्षर व फलक लेखनाचे विद्यार्थी
करतात.
याशिवाय काव्य, निबंध, कथा, लेखन स्पर्धांचे आयोजन केले जाते. स्वरचित
कथा, काव्य, वाचन, 'छात्र प्रबोधन', 'यंग एक्स्प्रेशन' सारख्या प्रसिद्ध अंकांमध्ये
विद्यार्थ्यांना लेखन, चित्रे देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. मेंदी रेखाटन,
गणेश चित्रे स्पर्धा ठेवल्या जातात. वक्तृत्व स्पर्धा, आकाशवाणी, दूरदर्शन
कार्यक्रमांसाठी अभिव्यक्तीची संधी विद्यार्थी घेतात.
विद्यार्थ्यांनी केलेली कृत्रिम फुले, पुष्परचना, सिरॅमिक्स, शिल्प, भौमितिक प्रतिकृती,
पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/५०
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(४४)रूप पालटू शिक्षणाचे