पान:रुपया.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ९६ ]

शक्य तितके देणे देऊन टाकून याउपर सव कर्ज हिंदुस्थानांतच काढावे व सोन्या-रुप्याची आयात व निर्यात अनियंत्रित ठेवावी. असे केल्याने देणे घेणे यांची वजावाट नैसर्गिक रीतीने होऊन, कृतिन रीतीनें हुंडणावळ ठरविण्याकरितां, हुंड्या व उलटहुंडया विकण्याची जरूर भासणार नाहीं.

 हुंडणावळ स्थिर राखण्याकरितां हुंड्या व उलटहुंड्या विकल्या पाहिजेत हे सर्वस्वी खरे आहे. हुंड्या न विकल्यास, एक्सचेंज बँका पौंडाचे रुपये कमी देतील. त्याचप्रमाणे हुंडणावळीचा दर खाली गेल्यास, उलटहुंड्या विकणे जरूर आहे. कारण असे न केल्यास, हुंडणावळ अधिक अधिक अवनत होऊन, रुपयांच्या मोबदला पौंड मिळणे हे सुवर्णसंलग्नचलनाचे मुख्य कार्य आहे ते होणार नाहीं; परंतु हे सर्व कृत्रिम आहे. सुवर्णसंलग्न ही पद्धतीच दोषयुक्त असल्यामुळे, ही सर्व समर्थने लंगडी आहेत. पद्धतीच वाईट असल्यामुळे, ती अमलात आणण्याची सर्व साधनेंही वाईट ठरतात. हुंडणावळीचा प्रश्न मुळांतच नाहींसा करण्यास सोन्याचे चलन करणे हाच एक मार्ग आहे. हा मार्ग आक्रमण न केल्यास, हुंड्या विकणे, जास्त रुपये पाडणे, महघेता, अधिक कर, अधिक शिल्लक व पुनरपि हुंड्या विकणे, हे अनर्थवर्तुल' ( Vicious circle) असेच फेऱ्या घालीत राहील,