पान:रुपया.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ९५ ]

नवीन पाडले असे पुढे दिलेल्या कोष्टकावरून दिसून येईल. हे सर्व रुपये हुंड्या विकण्याच्या पद्धतीने अस्तित्वात आले. सोने पाठविले असते व सोन्याचे नाणे च रुनांत जास्त प्रमाणावर आणले असते तर इतके रुपये पाडण्याची मुळीच आवश्यकता झाली नसती. या योगाने चलन बेसुमार झाले व त्याची फळे महागाईच्या रूपाने आज हिंदुस्थानास भोगावी लागत आहेत

 रुपया कृत्रिम असल्याने, तो अटविण्यापासून नुकसान होते. त्यामुळे चलन अधिक झाल्यास, ते अटवून कमी होण्याचा जो धर्म नैसगिक चलनपद्धतींत असतो, तो धर्म हल्लीच्या कृत्रिम पद्धतींत नाहीं. याही कारणाकरितां हल्लींची कृत्रिम पद्धति काढून टाकणे श्रेयस्कर आहे. महागाई झाल्यामुळे प्रत्येकास जास्त मजुरी, जास्त नफा घेणे भाग पडते; परंतु हा एका पातळीवर सर्व प्राप्ति आणण्याचा क्रम लवकर साध्य नसल्यामुळे, संप, नोकर व धनी यांमधील कलह, व्यापाऱ्याची सट्टेबाजी असे अनेक अनिष्ट प्रकार सुरू झाले आहेत. या सर्व कारणांनी देशांत असंतोष व अस्थिरता पसरून एकंदर आर्थिक स्थिति अधिकाधिक घोटाळ्याची व अन्यायाच्या आचरणास अनुकूल अशी झालेली आहे.

 नवीन स्थापन झालेल्या इंपीरियल बँकच्या हातांत इंग्लंडमधील सर्व देण्याघेण्याचे व्यवहार दिल्यास, यापैकी पुष्कळ दोष नाहींसे होतील. याशिवाय होमचार्जेस कमी करण्याकरितां पौंडांतील