पान:रुपया.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[९५ ]

जसे रुपये घेणे भाग पडते, तसे न होतां सोने घेणे अथवा त्याचे नाणे पाडणे हे लोकांच्या इच्छेवर अवलंबून राहील.

 एकंदरीत पहातां, सरकारी समर्थनाचे हे एक गृहीत् तत्व दिसते की, पौंड येथे पाठविल्यास, त्याचे रुपये घेतल्याशिवाय लोक राहणार नाहींत.असे झाले म्हणजे जे रुपये हुंड्या पटवून चलनांत आले असते, ते पौंड देऊन त्याच्या मोबदला चलनांत येतील. एवंच स्टेट सेक्रेटरीच्या कृत्याने किंवा लहरीने रुपयांचे चलने वाढलें असें म्हणतां येणार नाही. यावर हिंदुस्थानांतील तज्ज्ञांचे उत्तर असे आहे की, ज्या पद्धतीमुळे हुंडणावळीचा भाव काय न राखण्याकरितां इंग्लंडमध्ये जास्त सोने ठेवणे भाग पडते, ती पद्धतीच त्याज्य आहे.

 ही कृत्रिम पद्धति प्रचलित नसती तर रुपये किंवा पौंड या दोहोंचीही हिंदुस्थानास गरज लागली नसती होम चार्जेस जाऊन जे येणे निघेल, ते सोन्याच्या रूपाने हिंदुस्थानांत आले असते. यामुळे सोने हिंदुस्थानांत जास्त वाढले असते व त्याची किंमत अतिशय कमी झाली असती हे खरे; परंतु त्याचा चलनावर परिणाम होऊन किंमती भडकल्या नसत्या. वस्तुतः रुपयांची संख्या कमी करून त्यांची किंमत वाढविण्याच्या उद्देशाने टांकसाळ सरकारने बंद केली; परंतु आतां ते धोरण बाजूलाच राहून रुपये उलटे जास्तच वाढत चालले आहेत. १९०० पासून १९१० पर्यंत एकंदर दहा वर्षांत अदमासे ११२ कोटि रुपये