पान:रुपया.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[९३ ]

 हें समर्थन चेंबरलेन कमिशनच्या अहवालांत दिलेले आहे ते येणेप्रमाणे. जर हुंड्या न विकल्या, तर व्यापारी व बँका पौंड पाठवितील; नंतर तेथील बँका हे पौंड पटवून रुपये घेतील. कारण त्यांना आपल्या गिऱ्हाइकांस रुपये द्यावयाचे असतात. असे झाल्याने पौंड हिंदुस्थानांतील खजिन्यांत जमून त्यांचा कांहीं उपयोग न होतां, ते तेथे कुजत पडतील. तेच सोनें स्टेट सेक्रेटरीजवळ इंग्लंडमध्ये असल्यास, त्याचा उपयोग करता येईल, किंवा खजिन्यांतील रुपये संपल्यास नवे पाडावे लागतील व हे पाडण्याकरितां रुपें इंग्लंडांत खरेदी करावयाचे असल्यामुळे, तेच पौंड पुनः इंग्लंडमध्ये येतील. मग ते प्रथमच अडकवून ठेवलेले काय वाईट ?

 या मुद्यांचा विचार पूर्वी केलाच आहे. पौंडांचे चलन जास्त वाढविल्यास, पौंड कुजत राहण्याचे कांहींच कारण नाहीं. हल्लींची पद्धति कायम ठेवून पौंड चलनांत आणणे कठिण आहे असे अटले तर, त्याला उत्तर हेच की, अशा तऱ्हेची कृत्रिम पद्धति काढून सोन्याचे चलन करावे हेच उत्तम आहे. सोन्याचे चलन केल्यास हे पौंड येथे अनायासें चलनांत उपयोगांत येतील. याहीपेक्षा उत्तम उपाय हा कीं, पौंडही न आणतां सोनेच आणावें म्हणजे चलन कोणत्याही प्रकारे न वाढतां हें सोने देशांत धातूच्या रूपाने राहील. जरूर पडल्यास या सोन्याचे वाटेल तेव्हां नाणे पाडणे, सोन्याची टांकसाळ उघडली असतां शक्य होईल. म्हणजे हल्ली