पान:रुपया.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[९१ ]

 यासंबंधाने दुसरा एक प्रश्न उद्भवतो. शिल्लक हिंदुस्थानांत पुष्कळ आहे ह्मणून स्टेट सेक्रेटरी जास्त हुंड्या विकतो. कारण शिलकीत रुपये असल्याशिवाय हुंड्या पटविता येणार नाहीत ; परंतु इतकी शिल्लक आली कशी ? व ही येणे चांगले आहे काय ? जास्त शिल्लक आहे याचा अर्थ करांच्या रूपानें खर्चापेक्षा जास्त जमा सरकारी खजिन्यांत आली. पण असे करणे अयोग्य आहे. बजेट असे केले पाहिजे की, खर्चाच्या अदमासानेच जमा ठेविली पाहिजे. एखाद्या वषी चुकून जास्त शिल्लक राहिल्यास, पुढल्या वर्षी करांचे प्रमाण कमी केले पाहिजे. हा मुद्दा नामदार गोखले यांच्या बजेटावरील वरिष्ठ कौन्सिलांतील भाषणांत अतिशय विशद केलेला आहे व तो वाचकांनीं अवश्य वाचावा. एकंदर विचार करितांना असे दिसते की, होमचार्जेसपेक्षां एका पौंडाच्याही जास्त हुंड्या स्टेट सेक्रेटरीने विकू नये. या हुंड्या एक्सचेंज बँकांना सोईच्या असतात; परंतु त्यांचे हिताहित मणजे हिंदुस्थानचे हिताहित नव्हे हे कधीही विसरता कामा नये. चेंबरलेन कमिशनने असे ठरविले आहे की, स्टेट सेक्रेटरीच्या इच्छेवरच ही गोष्ट सोपवावी व कायद्याने त्याच्या कृत्यास नियंत्रण घालू नये. चेंबरलेन कमिशनचा रिपोर्ट एकंदर प्रतिगामी असल्यामुळे, त्यांतील इतर सूचनांप्रमाणेच हीही सूचना ‘स्थितस्य गतिः समर्थनीया' या न्यायाला अनुसरून आहे यात नवल नाहीं.

 अंदाजपत्रकाच्या बाहेर दरसाल जास्त शिल्लक राहते हे पुढील आंकड्यांवरून समजेल. १९०१ पासुन १९०५ पर्यंत अंदाज