पान:रुपया.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[८८ ]

पाठविणे. कांहीं वर्षांच्या अनुभवाने हुंड्या आधी विकण्याची पद्धतीच उत्तम ठरली व १८६२ पासून दर महिन्यास एकदां याप्रमाणे हुंड्या विकू लागले. प्रथम या हुंड्या ठरीव दराने विकीत असत. नंतर कांहीं बनीं टेंडरे घऊ लागले व दर आठवड्यास हुंड्या विकू लागले.

 ही हुंड्यांची पद्धत हिंदुस्थानचा निर्यात माल जास्त आहे ह्मणूनच शक्य आहे. व्यापाराच्या एकंदर व्यवहारांत आह्मांस दुस-या देशांकडून इतके येणे असते की, त्यापैकी कांहीं रक्कम स्टेट सेक्रेटरीला वसुल करण्यास सांगण्यास हिंदुस्थानास कांहींच दिक्कत वाटत नाहीं. हुंड्या विकूनही जे आणखी येणे राहिले, त्याबद्दल पूर्वी रुपें येत असे; परंतु १८९३ मध्ये टांकसाळे बंद झाल्यापासून रुपे घेण्यांत फायदा नसल्यामुळे, सॉव्हरिन किंवा सोन्याचा गट पाठविण्याची वहिवाट सुरू झाली.

आतां या पद्धतीत काय दोष आहेत ते पाहून, त्यासंबंधी काय उपाय योजिले पाहिजेत हे पाहूं. पहिला दोष असा आहे की, या पद्धतीने स्टेट सेक्रेटरीजवळ कारण नसतांना जास्त जास्त शिल्लक साचत जाते. १९१२ मध्ये ही शिल्लक २७ कोटि होती. ही शिल्लक बिनव्याजी पडू नये ह्मणून ती लंडन येथील बँकांस व व्यापाऱ्यास व्याजाने देतात. त्यामुळे हिंदुस्थानांत '७|८ टक्के व्याज देऊनही पैशाची टंचाई ज्या वेळेस असते, त्या वेळेस ही शिल्लक २||-३ टक्के व्याजाने तेथील व्यापाऱ्यास मिळू शकते.