पान:रुपया.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( ४ )

देणे देण्याकरितां चांदी पाठविणे पुष्कळ वेळां फायदेशीर पडू लागले. याशिवाय हुंडणावळ नेहमीं बदलत असल्यामुळे युरोपांत स्वस्त भावाने चांदी खरेदी करून ती हिंदुस्थानांत आणून तिचे रुपये पाडावे व येथील माल विकत घेऊन तो युरोपांत सोन्याच्या नाण्यांत विकावा असा क्रम सुरू झाला. या दोनही कारणांनी रुपयांची संख्या हिंदुस्थानांत वाढू लागली व त्यामुळे रुपया व पौंड यांमधील प्रमाण रुपयाच्या प्रतिकूल असे होऊ लागले.

 याच वेळेस रुपयाची किंमत कमी होण्यास आणखी एक प्रबल कारण अंशभागी झाले. खुली टांकसाळ असतांना कोणत्याही नाण्याची किंमत त्यामध्ये असणाऱ्या धातूच्या किंमतीबरोबर असते. या तत्त्वानुसार रुपयाची किंमत आंतील रुप्याच्या किंमतीबरोबर असे. ही रुप्याची किंमत या सुमरास अतिशय कमी झाली. १८५४ मध्ये स्पेन देशानें आपलें नाणे सोन्याचे केले. १८७० मध्ये जर्मन साम्राज्यानेही सुवर्णाची एकचलनपद्धति स्वीकारली, व पूर्वीचे रुप्याचे नाणे वितळून विकण्यास काढले. १८७३ मध्ये लॅटिन यूनियनों (फ्रान्स, स्विझलंड, इटली, बेल्जम, ग्रीस, स्पेन हे देश याचे मुख्य घटक होते ) आपला बुल टांकसाळ रुप्यापुरती बंद केली. अशा रीतीने युरोपांतील रुप्यास मागणी कमी झाल्यामुळे व सोन्यास मागणी जास्त झाल्यामुळे, ये हे सोन्याच्या व अर्थात् सोन्याच्या नाण्याच्याही तुलनेने कमी