पान:रुपया.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





( ३ )

वाटल्यावरून इंग्लंडांतील ट्रेझरीनं याविरुद्ध आक्षेप घेतले; व हिंदुस्थान सरकारास गम खावी लागली. तेव्हांपासून हे घोंगडे असेच भिजत पडलें आहे.

 १९१२ सालीं नामदार गोखले, सर विठ्ठलदास थाकरसी व इतर वरिष्ठ कौंसिलचे सभासदांनीं टांकसाळींत सोन्याचे नाणे पाडण्याविषयीं व खुली टांकसाळ करण्याविषयी ठराव पुढे आणला. परंतु पुन्हां ट्रेझरीने आक्षेप घेतल्यामुळे स्टेट सेक्रेटरी यांनी अशी युक्ति काढली कीं, दहा रुपयांचे नाणे काढले ह्मणजे ट्रेझरीच्या संमतीची जरूर राहणार नाही. परंतु यानंतर लवकरच एक नवें कमिशन नेमले गेले व त्याने हे सर्व प्रकरण फेटाळून लावले. सोन्याचे नाणे में हिंदुस्थानास फायदेशीर होणार नाही असे या कमिशनचे मत होते. अशा रीतीने अनेक वेळां द्विर्बद्ध सुबद्ध झालेल्या सोन्याच्या नाण्याचा लोप होऊन आज मितीस रुप्याचे नाणे हे हिंदुस्थानांतील मुख्य नाणे होऊन बसले आहे.

 आतां ज्या कारणाकरितां १८९३ सालीं खुली टांकसाळ बंद केली त्या करणांचा विचार करणे अवश्य आहे. १८९३ च्या पूर्वी रुप्याचे नाणे पाडण्याकरितां टांकसाळ खुली केली होती. कोणाही व्यक्तीस एक विवक्षित वजनाची चांदी देऊन रुपये पाडून घेण्याचा हक्क होता. १८० ग्रेन अथवा १५/16 तोळे चांदी दिली म्हणजे एक रुपया मिळे. टांकसाळ खुली असल्यामुळे इंग्लंड किंवा इतर देशांतील व्यापारी यांना हिंदुस्थानांतील लोकांचे