पान:रुपया.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[ ८४ ]

 हे दोन्ही सिद्धांत चुकीचे आहेत. हुंड्यांचे काम फक्त होमचार्जेसचे पैसे स्टेट सेक्रेटरीकडे जमा करणे हे आहे. व्यापाराशीं सरकारास कांहीएक कर्तव्य नाहीं. व्यापाराच्या घडामोडी आपआप बँकांच्यामार्फत होत असतात. त्यांत साधारणपणे सरकारने पडता कामा नये. एखादे वेळी आपत्काल म्हणून कांहीं तात्पुरती व्यवस्था करणे आवश्यक असते; परंतु होईल तिनके नैसर्गिक पद्धतीने कार्य झालेले चांगले. दुसरा सिद्धांत कांहीं अंशी खरा आहे. दुष्काळाच्या सालीं हुंडणावळ खाली गेली असतां, ती उलट हुंड्या विकून पूर्वस्थलावर आणतां येते ही गोष्ट १९०७ सालीं व १९१४-१५ सालीं सिद्ध झाली आहे; परंतु उलट हुंड्या विकणे ही गुरुकिल्ली वाटेल त्या प्रसंगीं सारासार विचार न करितां लावू पहाणे हे अनुभवाचे विरुद्ध आहे. हल्लीची स्थिति अशी आहे की, रुपें महाग असून सोनेही महाग आहे व स्मिथकमिटीचे मापें १ रु० = २ शिलिंग ( सोनें ) असा दर होण्यास सोने १६ रुपये तोळा झाले पाहिजे व रुपे अतिशय महाग असले पाहिजे. ह्या दोनही गोष्टी जगांतील घडामोडीवर अवलंबून असल्यामुळे, अशी स्थिति मी आपल्या कृतीने करीन असे म्हणने हास्यास्पद आहे. वास्तविक पहातां, हल्लींच रुपें अधिक अधिक स्वस्त होऊ लागले आहे व ते पुनः पूर्वप्रपाणे स्वस्त झाल्यास, १ पौंड = १० रुपये हा दर टिकणे शक्य नाहीं. त्याचप्रमाणे सोने स्वस्त झाले पाहिजे. पण तसंही होण्याचा