पान:रुपया.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ८५ ]

संभव दिसत नाही. उलट ते अधिकच महाग होत चालले आहे. अशा स्थितीत नुसत्या उलट हुंड्या विकून जबरदस्तीने हुंडणावळ खेंचू अशी आशा करणे व्यर्थ आहे. हे वैयर्त्य सरकारने नुकतंच कबूल आहे ही त्यांतल्या त्यांत समाधानाची गोष्ट आहे. हा विषय मनोरंजक आहे; पण स्थलसंकोचास्तव याहून जास्त विस्तार यथे शक्य नाहीं.

 कौन्सिलबिलें किती विकतात याची कल्पना येण्याकरित कांहीं वर्षांचे आंकडे खाली दिले आहेत. ( लक्ष रुपये.)

  वर्ष. हुंड्या. दर पेन्स, होमचार्जेस.
  १९०१  २८,००  १५९८  २५,२०
  १९०२  २८,००  १६००   २६,४०
  १९०३  ३५,८५  १६०४  २६,१०
  १९०४  ३६,६०   १६०४  २८,२०
  १९०५  ४७,४०  १६०४  २६,४०
  १९०६  ५०,१०  १६०८  २७,४५
  १९०७  २२,९५  १६०२  २६,५५
  १९०८  २०,८५  १५९६  २७,४५
  १९०९  ४ १,२५  १६०४  २७,६०
  १९१०  ३९,७५  १६०६  २७,९०
  १९११  ४०,६५  १६०८  २८,२०
  १९१२  ३८,५५  १६०५  २८,९५
  १९१३  ४६,८०  १६०७  २९,१०
  १९१४  ११,५५  १६००  २९,२५
  १९१५  ३०,४५  १६०८  २९,१०