पान:रुपया.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[८२ ]

पूर्वीचा भाव बदलून १ : १० असा करावा. असे न केल्यास सर्व रुपये आटविले जाऊन, नोटांचे चलन हें निराधार होऊन नोटांबद्दल रुपये देणे अशक्य होईल. त्यामुळे रुपयाचा भाव पौंडांत जास्त केला म्हणजे रुपें १ रु. १० आणे ताळा असले तरीही रुपया पाडण्यांत नुकसान होणार नाहीं; परंतु पौंड हा स्वतःच बदलत असल्यामुळे, एखाद्या वेळी पौंडाची किंमत ५ डॉलर असते ; कधीं कधीं ४ डॉलर असते व कधी कधीं ३ डॉलरही होते. त्यामुळे पौंड शब्दाचा अर्थ सॉव्हरिन हे नाणे अथवा ग्रेटब्रिटनमधील चलनाचे मापन असा न घेतां, एका पौंडांत जितकं सोने असते, तितकें सोने असा करावा म्हणजे सॉव्हरिनच्या गाड्याबरोबर रुपयाच्या नव्याची यात्रा नको. असे स्मिथ कमिटीने ठरविल्यानंतर, स्टेट सेक्रेटरी व हिंदुस्थान सरकार यांनी ते मान्य करून, ही सूचना अमलात आणण्यास सुरुवात केली.

 सुरुवातीलाच असे दिसून आले की, १ रु० = २४ पेन्स = २ शिलिंग ( सोने ) हे प्रमाण जर अंतिम साध्य ठेवावयाचे असेल, तर त्या मानाने हल्लीच्या हुंडणावळीचा भाव कमी आहे. त्या वेळेस हुंडणावळीचा भाव १ रु० = २६ पेन्स स्टर्लिंग असा होता; परंतु स्टर्लिंगची अथवा सॉव्हरिनची किंमत सोन्यांत कमी असल्यामुळे, २६ पेन्स स्टर्लिंग हे सोन्यांत फक्त १८ १/५ पेन्स इतके होते. अर्थात् १ रु० = १८ पेन्स हा भाव होता त्या