पान:रुपया.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[८१ ]

मुळे व पौंडाची किंमत डॉलरच्या तुलनेने कमी कमी होत चालल्यामुळे, लोकांस अशी भीति पडली की, हुंड्यांचा भाव २८ पेन्सांऐवजी ३०।३२ पेन्स असा होईल; याकरितां २८ पेन्सांच्या भावाने हुंड्या न घेतल्यास, शेवटीं अधिकच नुकसान होईल. अशी स्थिति झाल्यामुळे पुनः हुंड्यांना मागणी येऊ लागली; परंतु हुंड्यांचा जो भाव असतो, तोच रुपये देऊन डॅफ्ट घेण्याचाही असतो. असे असल्याने, हिंदुस्थानांत कोणी रुपये दिल्यास त्याला प्रत्येक रुपयामागे २८ पेन्स देणे जरूर आहे. या २८ पेन्सांचा फायदा घेण्याकरितां व पुनः हुंडणावळ काय होईल याचा निश्चय नसल्यामुळे, येथील व्यापाऱ्यांनीं व बँकांनी उलट हुंड्या मिळण्याविषयी मागणी केली. सरकारच्या हल्लीच्या धोरणाप्रमाणे रुपये कोणी दिले असतां पौंड देणे हे सरकारचे कर्तव्य, आहे. त्याचप्रमाणे व्यापारास मदत करणे हेही कौन्सिलबले अथवा हुंड्या व · उलट हुंड्या' यांचे मुख्य कार्य आहे असे आजपर्यंत जाहीर केल्याने, सरकारनं उलट हुंड्या विकण्यास सुरुवात केली व १९२० च्या जानेवारींत ८ कोटींच्या रुपयांच्या * उलट हुंड्या' विकल्या.

 यानंतर या नवीन परिस्थितीचा विचार करून पुनर्घटना करप्याच्या विचाराने स्मिथकमिटी सरकारने नेमिली. त्या कमिटीने असे ठरवले की, एक रुपया टांकसाळींत पाडण्यास अदमासे १ १/४ रुपया खर्च पडत असल्यामुळे, रुपया व पौंड यांचा