पान:रुपया.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ८० ]

आणे किंमतीचे रुपें विकत घेतले पाहिजे. अशा स्थितीत एकी पौंडास १५ रुपये देणे घेणजे २३ रुपये किंमतीचे रुप लोकांस देण्यासारखे आहे.

 वरील कारणामुळे हुंड्यांची भाव वाढविणे आवश्यक झालें वे एक रुपयाऐवजी जास्त पेन्स घेण्याचे स्टेट सेक्रेटरीने ठरविले. प्रथम हुंडणवळीचा दर १८ पेन्स केला व पुढे रुपे आणखी महाग झाल्यामुळे २० पेन्स, नंतर २२ पेन्स, नंतर २४ पेन्स वे १९१९ डिसेंबरमध्ये २८ पेन्स केला. भाव वाढल्यामुळे हुंड्या विकत घेण्यास कोणी तयार होईना. हिंदुस्थानांत रुपये मिळाल्यानंतर एक्सचेंज बँका पुनः हिंदुस्थानांत लंडनवर ड्रफ्ट खरेदी करतात. हीं बिलें हिंदुस्थानांतील ज्या लोकांनी इंग्लंडांत माल पाठविला असतो, त्यांनी आपल्या रिणकोच्या नांवावर दिलेली असतात. हे डॅफ्ट दाखवून बँका पौंड वसूल करितात व नंतर पुनः हे पौंड कौन्सिलबिले विकत घेण्याकरिता उपयोगांत आणितात. अशा रीतीने एक्सचेंज बँकांची मुख्य देवघेव आहे. हिंदुस्थानांत रुपये मिळून पुनः बिलें खरेदी करण्याची वेळ आली हुंडणाअळीचा भाव २८ पेन्सांऐवजी २४ पेन्स झाला तर प्रत्येक रुपयामागे ४ पेन्स = आणे नुकसान होणार. या अस्थिरतेमुळे हुंड्या घेण्यास विशेष कोणाचा धीर होईना; परंतु हुंड्या घेतल्याशिवाय रुपये मिळणे शक्य नसल्यामुळे, सरतेशेवढी हुंड्या घेणे बँकांस भाग पडलें. शिवाय रुपें अधिक अधिक महाग होत चालल्या