पान:रुपया.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ७९ ]

राचा एकंदर कल हिंदुस्थानच्या विरुद्ध होता. त्यामुळे हुंड्या फक्त १०,७९ लक्षांच्याच विकल्या गेल्या. व ‘उलट हुंड्या १३,०६ लक्षांच्या विकाव्या लागल्या.

 अशा रीतीची उलट हुंड्यांची रचना असते. आतां गेल्या दोन वर्षांत उलटे हुंड्या कां विकल्या हे पाहू. १९१८ मध्ये रुपें महाग झाल्यामुळे, रुपयांची किंमत वाढली. त्यामुळे १ पौंडास १५ रुपये देणे अशक्य झाले. हुंड्या नेहमीच्या भावाने विकल्यास, जास्त किंमतीचे रुपये लोकांना मिळून, ते अटविले असतां, लोकांना फायदा पडू लागला. तो असा. रुप्याची किंमत एका तोळ्यास ४० सेंट अशी अमेरिकेंत होती. हे रु लंडनमध्ये खरेदी केल्यास, नेहमीच्या हुंडणावळीप्रमाणे २७ पेन्से द्यावे लागतात; परंतु या वेळेस पौंड व डॉलर यांमधील प्रमाण बदलल्यामुळे, एका पेन्साची किंमत दोन सेंट न राहता, दीड सेंट झाली होती ; त्यामुळे ४० सेंट हे = २६ १/३ पेन्सांबरोबर झाल्यामुळे, एका तोळ्यास लंडनमध्ये अदमासे २७ पेन्स पडू लागले, २७ पेन्स हे = २७ आण्यांबरोबर आहेत त्यामुळे एका तोळ्याची किंमत २७ आणे झाली. एका रूपयांत १८० ग्रेन रुपे असल्यामुळे, एका तोळ्यांत (= १९२ ग्रेन ) १९२/१८०= १ १/१५रुपये पडतात, म्हणजे १ /१५ रुपयांची किंमत २७ आणे झाली व एका रुपयाची किंमत अदमासे २५ आणे आली. याचा अर्थ असा की, १६ आण्यांच्या किंमतीचा रुपया पाडण्यास २५