पान:रुपया.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ७८ ]

यांत ११,५६ बाकी देणे निघालें. (लक्षापुढील शून्ये दिली नाहींत. )

 दोनही वर्षांत बाकी देणे निघाले त्याचा अर्थ व्यापार प्रतिकूलआहे असा नसून, सोने, रुपये व सिक्यूरिटी आम्ही लोक किंवा सरकार यांनी जास्त घेतल्या. फक्त निर्यात व आयात मालाकडे पाहिले असता असे दिसून येईल की, १९०९-१० मध्ये नुसत्या व्यापारांत आमचे ७० कोटि ८२ लक्ष येणे निघालें व १९१२१३ मध्ये ६५ कोटि ६३ लक्ष रुपये निखालस येणे निघाले.

 वरील आंकड्यांवरून, सामान्यतः उलट हुंड्या विकण्याचा प्रसंग कां येत नाहीं हे उत्तम रीतीने समजेल. आतां ज्या साली हुंड्या विकाव्या लागल्या, त्या सालीं व्यापाराची काय स्थिति आहे हे पाहिले म्हणजे, तुलनेने, नेहमींची स्थिति व विशिष्ट स्थिति यांमधील भेद कळून येईल. १९१४-१५ सालीं निर्यात माल १८१,६० लक्ष होता व आयात माल १३७,९३ लक्ष होता व यांमधील फरक ४३,६७ लक्ष रुपये हा सरासरीने होमचार्जेस भागण्यापुरता होता ; परंतु पौंड १,६५ लक्ष, सोनं ६,८०, लक्ष, रुपें १०,०१ लक्ष व ३५ लक्ष सिक्युरिटी मिळुन १८,८? लक्ष अधिक देणे झालें. किंवा दुसऱ्या तऱ्हेने हिशोब केल्यास, मालाची आयात १३७,९३ लक्ष व ही दुसरी आयात मिळून १५६,७४ लक्ष एकंदर देणे निघाले. निर्यातीबद्दल येणं १८१, ६० लक्ष निघाले. मिळून २४,१६ लक्ष निखालस येणे निघाले. ही रकम होमचार्जेस भागविण्यास पुरी नाही. अर्थात् व्यापा