पान:रुपया.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[ ७७ ]

 या व्यवहाराची बरोवर कल्पना येण्याकरितां एक दोन सालचे व्यापाराचे आंकडे घेऊं. १९०९-१० मध्ये निर्यात माल १८७ कोटि ८८ लक्ष रुपयांचा होता व आयात माल ११८ कोटि ६ लक्षांचा होता. याची वजाबाकी करून ७० कोटि ८२ लक्ष रुपये आमच्या वतीने येणे निघाले. हे येणे निघालें त्यापैकी ४१ कोटि ७३ लक्षांचीं कौन्सिलबिले विकलीं. हे एक प्रकारचे देणेच झाले. ते वजा जातां, २९ कोटि ९ लक्ष रुपये येणे अद्यापि बाकी राहिले; ते १३ कोटि ८२ लक्षांचे पौंड ; ७ कोटि ८६ लक्ष सोन्याचा गट व ९ कोटि ३७ लक्ष रुपें या रूपाने आम्हास मिळाले. ( १३,८२ + ७,८६ +९,३६ = ३१,०५ ). ३१ कोटि ५ लक्षांतून घेणे २९ कोटि ९ लक्ष गेलें ह्मणजे १ कोटि ९६ लक्ष शेवटी देणे निघते. हे देणे निघालें तें खाजगी लोकांनी येथे आणलेल्या सिक्यूरिटी व इंग्लंडांतून आणलेले कर्ज यांकरितां होतें. १९१२-१३ मध्ये अशी स्थिति होतीः–जमा.

निर्यात माल २४८,८८  आयात माल १८३,

      हुंड्या ४६,६०,
      पौंड १ १,३४.
      सोने गट ११,८९.
      रुपें ६,२४.
      सिक्यूरिटी १,१२.
_________________ ________________
एकूण २४८,८८.     २६०,४४.