पान:रुपया.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



[७६ ]

देण्यास तयार आहों. तुम्हास बँकेकडे जाण्याची जरूर नाहीं. अशा रीतीने ४।५ कोटींच्या ‘उलट हुंड्या' विकल्या म्हणजे बँकांनाही हा भाव कबूल करावा लागतो व सर्व परिस्थिति पालटून जाऊन हूंडणावळ पुनः पूर्वपदावर येते.

 यावरून असे दिसून येईल की, सामान्यतः ‘उलट हुंड्या विकण्याचा प्रसंग येत नाहीं. हिंदुस्थानांतून जाणारा निर्यात माल हा नेहमीच आयात मालापेक्षा ७०।८० कोटींनीं अधिक असतो. त्यामुळे हिंदुस्थानास पैसे देणे नसून होमचार्जेस भागूनहीं कांहीं तरी घेणेच असते. यालाच “ अनुकूल व्यापार [ favourable balance of trade ] असें ह्मणतात. या कारणाने हुंड्यांचीच नेहमीं अपेक्षा असते. कारण आयात मालाबद्दलचे आमचे कर्ज वारूनही यूरोपांतील लोकांनी आम्हास ७०|८० कोटि रुपये द्यावयाचे असतात. त्यामुळे लोक चढाओढ करून हुंड्या विकत घेतात. १६ पेन्सांपेक्षाही जास्त रक्कम देऊन एक रुपया घेणे हे त्यांस इष्ट असते. त्यामुळे हुंडणावळ रुपयाच्या विरुद्ध जाण्याची भीति नसून, उलट पौंडास प्रतिकूल होण्याचीच जास्त भीति असते; परंतु दुष्काळांत हे सर्व बदलते च आयात मालापेक्षां निर्यात माल विशेष जास्त नसल्यामुळे, हुंडणाक्ळ खाली येऊन, रुपयास प्रतिकूल व पौंडास अनुकूल अशी होते. अशा प्रसंग पौंडाची टंचाई भासते व ती कमी करण्याकरितां ‘उलट हुंड्यांचा प्रयोग करावा लागतो,