पान:रुपया.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[ ७५ ]

यास १५ किं १४ पेन्स देऊ लागल्या, तर रुपयाची अवनति होऊन, पौंडाची उन्नति होऊ लागते. असे कां होते, तर आंतरराष्ट्रीय देणे हिंदुस्थानास द्यावयाचे असते व ते देण्याकरितां सोने किंवा सोन्याचे नाणे ज्यायोगाने मिळेल असा ड्रफ्ट यांची जरूर असते; परंतु हे सोन्याचे नाणे हिंदुस्थानांत विशेष प्रमाणांत नसते हे पूर्वी सांगितलेच आहे. अशा वेळीं लोक सरकारास आपली हुंडणावळ कायम ठेवण्याविषयीं आव्हान करितात. रुपया देऊन जर साने मिळाले नाही, तर सुवर्णसंलग्नचलन राहिले कोठे ? चलनांतही सुवर्ण नाहीं व आवश्यक सुवर्ण तेही रुपयांच्या मोबदला मिळत नाही असे झाले म्हणजे सर्वच ग्रंथ आटोपला. याकरितां सरकारास “ उलट हुंड्या ' ( Reverse Councils) विकणे भाग पडते व त्याप्रमाणे ते करतेही.

 |“ उलट हुंड्यां' ची पद्धति अशी आहे. हिंदुस्थानांत नोटा किंवा रुपये देऊन सरकारजवळून पौंडाचा डॅफ्ट घ्यावयाचा ; व तो इंग्लंडांत धनकोकडे पाठवून द्यावयाचा ; नंतर तो धनको इंडिया ऑफिसमध्ये हा डॅफ्ट अथवा “ उलट हुंडी' दाखवून तेथे पौंड घेतो. असे केल्याने हुंडणावळीचा दर परत खेचला जाऊन, पुनः १ रु० = १६ पेन्स या बिंदूवर येतो. दुसऱ्या तऱ्हेनेही ही गोष्ट सांगता येईल. एक्सचेंज बँकेकडे गेल्यास, ती रुपयास १४ पेन्सचा ड्रफ्ट देता येईल असे सांगते. सरकार असे सांगते की, आमच्या संकल्पाप्रमाणे आम्ही रुपयास १६ पेन्स