पान:रुपया.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[७४ ]

हुंडया विकण्याचे बंद करतो; परंतु त्यामुळे असा परिणाम होता की, इतर बँका याचा फायदा घेऊन हिंदुस्थानांत इंग्लंडवर जे रेमिटन्सेस' विकतात, ते कमी भावाने विकू लागतात. उदाहरण, हुंडणावळीचा दर १५ पेन्स झाला म्हणजे हिंदुस्थानांत १ रुपया दिल्यास त्याला 'रेमिटन्स' बद्दल इंग्लंडांत फक्त १५ पेन्सच मिळतात; परंतु लोकांना रोमेटन्स' ची जरूर असल्यामुळे, ते ह्या भावानेसुद्धा सवदा करण्यास तयार असतात. कारण स्टेट सेक्रेटरी जेव्हां हुंड्या विकण्याचें बंद करतो, त्या वेळेस निर्यात मालापेक्षा आयात माल जास्त असून, हिंदुस्थानास इंग्लंडचे देणे, घेण्यापेक्षा जास्त असते अशी स्थिति असते. निर्यात कमी असल्यामुळे, लंडनमध्ये हुंड्या कोणीच घेत नाही. कारण इंग्लंडने हिंदुस्थानास पैसे देणे नसून, उलट हिंदुस्थानांतून पैसे येणे असतात. अशी स्थिति बहुतकरून दुप्काळाच्या साली येते. दुष्काळामुळे गहूं, कापूस, गळिताची धान्ये इत्यादि निर्यात माल बंद असल्यामुळे, व्यापाराची तफावत आमच्या विरुद्ध असते. अर्थात् आम्हास देणे निघते; परंतु लोकांच्या गरजा नेहमीप्रमाणेच असल्यामुळे, आयात मालाचा सपाटा चाललेलाच असतो, अशी स्थिति झाली म्हणजे हुंडणावळीचा दर खाली खाली जाते.

 आतां हा दर खाली जाऊ देणे हे सुवर्णसंलग्नचलनाच्या विरुद्ध आहे. या चलनाचे आद्य तत्त्व हे आहे की, १ रु० = १६ पेन्स हे गुणोत्तर कायम ठेवावयाचे. आतां बँका जर एका रुप