पान:रुपया.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

<br>

[ ७३ ]

आम्ही हुंड्या विकू असें इंडिया ऑफिसने जाहीर केलेले आहे. त्याचप्रमाणें पौंड हिंदुस्थानात गेल्यास, ते पुनः आणण्याचा खर्च तितकाच असल्यामुळे, १६ पेन्स १/८ पेन्स = १५ ७/८ पेन्स ही हुंडीच्या भावाची खालची मर्यादा आहे. यापेक्षा कमी किंमतीस हुंड्या विकणे तोट्याचे होईल. या दोन मर्यादांच्या मध्ये कोठे तरी हुंड्यांचा भाव असला पाहिजे.

 ही मर्यादा पुष्कळ वेळां व्याजाच्या दरावर अवलंबून असते. व्याजाचा दर शेकडा ५ असल्यास, एका रुपयास पाऊण आणा व्याज होते व पंधरा दिवसांचे व्याज १/३२ आणे होते. कौन्सिलबिल विकत घेतल्यापासून रुपये मिळेपर्यंत १५ दिवस लागतात, त्यामुळे विकत घेणारा, एकदम (टी. टी. ने) रुपये मिळाल्यास,१/३२ आणे अथवा पेन्स देण्यास तयार होतो. व्याजाचा दर ७ १/२ असल्यास, टी. टी. ची किंमत याच्या दीडपट म्हणजे ३/६४ पेन्स इतकी, १६ पेन्सांपेक्षा अधिक देण्यास तो तयार होईल. म्हणजे वरची मर्यादा १६ १/८ पेन्स वर सांगितली ती १६ १/८ +३/३४ =१६ ११/६४ होऊ शकेल. अर्थात् हिंदुस्थानांत व्याजाचा दर वाढल्यास, हुंड्यांची किंमत ३/६४ पेन्सांनी वाढविण्यास हरकत नाहीं.

 आतां हुंडांचा दर १५ ७/८ पेन्सांपेक्षां खालीं जाणे शक्य, नाहीं. कारण इतका भाव कमी झाला म्हणजे स्टेट सेक्रेटरी