पान:रुपया.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ७३ ]

चार्जेसकरितां जरी हुंड्यांची जरूर नसली, तरी ती शिल्लक इंग्लंडांत नेण्यास हुंड्यांच्या योगाने मदत होते. उदाहरणार्थ, येथे दीड कोटि रुपये फालतू असल्यास, दीड कोटींच्या हुंड्या विकल्या म्हणजे त्यांच्या ऐवजी हे रुपये दिले म्हणजे स्टेट सेक्रेटरीची शिल्लक दहा लक्ष पौंडांनी इंग्लंडांत वाढते.

 सारांश, हिंदुस्थानांतील शिल्लक कोणत्याही कारणांनी जास्त असल्यास व ती इंग्लंडांत नेण्याची असल्यास, हुंड्या हे उत्तम साधन आहे. ही शिल्लक वाढल्याने, इंग्लंडांत कर्ज काढण्यास अनुकुल संधि सांपडली म्हणजे स्टेट सेक्रेटरीस त्या संधीचा फायदा घेता येतो. या सर्व कारणामुळे हुंड्या न विकणे म्हणजे हिंदु: स्थानांत बेफायदा शिल्लक जमा करणे होय. जर इंग्लंडांतील लोकांस हिंदुस्थानांत पैसे पाठविणे जरूर असेल व जर चांगली किंमत देण्यास ते तयार असतील, तर हुंड्या न विकल्याने हुंड णावळीचा भाव इतका वाढेल की, हिंदुस्थानांत पौंड पाठविणे स्वस्त पडेल व येथे पौंड आले म्हणजे पुनः वर सांगितलेली आपत्ति उत्पन्न होईल.

 इंग्लंडहून हिंदुस्थानांत सोने पाठविण्यास रुपयामागें । पेन्स खर्च येतो; त्यामुळे जर स्टेट सेक्रेटरी हुंडीचा भाव १६१ पेन्सपेक्षा जास्त ठेवील, तर हुंडी विकत घेण्यापेक्षां पौंड पाठविण जास्त स्वस्ते होईल. यामुळे मुंडीच्या भावाची वरची मर्यादा १६ पेन्स ही आहे. इतका भाव दिल्यास, कोणत्याही वेळी