पान:रुपया.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


{ ७१ ]

होईल. कारण हिंदुस्थानांत फक्त १५ रुपयांस १ पौंड मिळते, परंतु हुंडी विकून १४ रु० १४ आण्यांस पौंड मिळतो.

 ह्या आपत्तीस आमच्या मते दोन उपाय आहेत. एक्सचेंज बँकांकडे पौंड आल्यास, त्यांनी ते तसेच आपल्या गि-हाइकांस द्यावे व त्यांनीही त्यांचा चलनांत उपयोग करावा. लोकांच्या जवळ पौंड आल्यास, ते सर्व पौंड खजिन्यांत देऊन, लोक रुपये मागतील हे नेहमी गृहीत धरले जाते; परंतु हे पुष्कळसे काल्पनिक आहे. सोन्याचे चलन लोकप्रिय करण्याची खटपट केल्यास, पुनः रूपये पाडण्याची आवश्यकता राहणार नाही. शिवाय रुपे खरेदी करण्यास लंडनच पाहिजे काय ? हिंदुस्थानांत रुपें खरेदी १रण्याची पद्धति पाडल्यास, येथेही रुप्याचा बाजार सुरू होईल. अस्तु; या पद्धतीचे दोष दाखविण्यापूर्वी ही पद्धति काय आहे हे समजून घेणे जास्त सोईचे होईल,

 दुसरें हुंड्या विकण्याचे कारण असे आहे. नोटांच्या निधींत सोने येथे जास्त झाल्यास, तें स्टेट सेक्रेटरीकडे पाठवावें लागेल. तेव्हां हुंड्या विकून इंग्लंडांतील नोटांच्या निधींत सोनें जमा करावें व हुंड्यांचे रुपये येथील नोटांच्या निधीतून द्यावे हें स्टेट सेक्रेटरीच्या धोरणाच्या दृष्टीने जास्त हितावह आहे. असे करण्याने आपोआप स्टेट सेक्रेटरीचा नोटांच्या निधि वाढत जातो व ते हुंडावळ स्थिर ठेवण्यास त्याला उपयोगात आणता येतो. त्याचप्रमाणे हिंदुस्थानांत खजिन्यांत जास्त शिल्लक जमल्यास, होम.