पान:रुपया.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ७० ]

दिल्याबरोबर हिंदुस्थानांत रुपये मिळतात. या फायद्यामुळे स्टेट सेक्रेटरी टी. टी. बद्दल १/३२ पेन्स जास्त चार्ज करितो. हिंदुस्थानांत व्याजाचा दर जास्त असल्यास, लोक टी. टी. पसंत करितात.

 १९०९ पर्यंत होमचार्जेसच्या रकमेइतक्याच हुंड्या विकीत असत. कधी कधी हुंड्या कमी विकल्या जात. कारण कधीं कधी त्यांना मागणी कमी असे. १९०९ नंतर या हुंड्यांचे महत्व वाढलेले आहे. सुवर्णसंलग्नचलनांत हुंडणावळ स्थिर ठेवणे हे एक प्रधानअंग आहे. हे करण्याकरितां इंग्लंडमध्ये पौंड दिल्यास हिंदुस्थानांत रुपये देणे हे आवश्यक आहे. असे न केल्यास, रुपयांची किंमत वाढून एक्सचेंज बँका वगैरे एका पौंडास बारा रुपये देऊ लागतील व ते घेणे भाग पडेल. शिवाय असे झाल्याने सुवर्णसंलग्नचलन ढांसळून पडेल.

 कौन्सिलबिलें न विकल्यास, व्यापारी व बँका हे पौंड हिंदु स्थानांत पाठवून तेथे ते करन्सी ऑफिसांत नेऊन रुपये मागतील व त्यामुळे सोने हिंदुस्थानांत सरकारजवळ जमा होईल. हे रुपये खजिन्यांतून गेले म्हणजे पुनः रुपये पाडण्याकरिता रुपे लागते व ते : लंडनमध्ये खरेदी करावें लागते. त्याकरितां हे पौंड पुनः इंग्लंडमध्ये पाठवावे लागतील. दोन वेळां सोने पाठविण्याचा खर्च फुकट जाऊन, हल्ली हुंड्या विकून होणारा नफा मात्र नाहींसा