पान:रुपया.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[६९ ]

स्थानांत रुपये मिळण्याचा हा महत्वाचा मार्ग असल्यामुळे, बँकांना ही बिले विकत घेणे फायद्याचे असते. कारण त्यांच्या हिंदुस्थानांतील शाखेमध्7 रुपयांची भरती करणे जरूर असते व या हुंड्यांच्या योगाने ते काम सहज होते.

 या हुंड्या दर बुधवारीं टेंडरे मागवून विकतात. त्यावेळेस त्यांची संख्या जाहीर केली जाते. सगळ्यांत कमीत कमी किंमत दिलेली असते व त्याच्या खाली हुंड्या मिळणार नाहीत असे ठरलेले आहे. टेंडरांमध्ये १ रुपयास किती पेन्स देऊ हे विकत घणारा नमूद करतो. नंतर लिलावाच्या पद्धतीप्रमाणे जास्त किंमत देणारास अगोदर, त्यानंतर सवडीप्रमाणे त्याच्यापेक्षा कमी किंमतीस मागणारास, याप्रमाणे एकंदर रकमेपर्यंत हुंड्या विकतात, एका आठवड्यांत मागणी पुष्कळ आल्यास, पुढच्या आठवड्यांत जास्त रुपयांच्या हुंड्या विकण्यास काढितात. मध्यंतरी कोणास विशेष जरूर असल्यास, पूर्वीच्या बुधवारच्या दरापेक्षा ३, पेन्स जास्त घेऊन, स्पेशल हुंड्या विकतात किंवा थोड्या कमी दराने साध्या हुंड्या चिकतात.

 ज्यांना ताबडतोब रुपयांची जरूर असते व हिंदुस्थानांत रुपये मिळेपर्यंत जो काळ जातो, त्याबद्दलचे व्याज बुडविण्याची इच्छा नसते; ते किंचित् अघिक भाव देऊन टेलेग्राफिक् ट्रॅन्स्फर अथवा टी. टी. (T. T.) विकत घेतात. असे केल्याने इंग्लंडमध्यें पौंड