पान:रुपया.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




प्रकरण ५वे
कौन्सिलबिले अथवा हुंड्या

 हिंदुस्थानसरकारास इंग्लंडांत पगार, पेनशने, व्याज इत्यादि करितां सोन्यांत जे देणे द्यावे लागते, त्याला होमचार्जेस म्हणतात. ही रक्कम हल्ली २८ पासून ३० कोटींपर्यंत असते. यांतून इंग्लंडांत नवीन काढलेले कर्ज वजा दिले म्हणजे, अदमासे २५ कोटि रुपये इंग्लंडांत पाठविणे भाग आहे. या कारणाकरितां 'कौन्सिलबिले ' विकण्याची क्लूप्ति काढलेली आहे. कौन्सिलबले हीं स्टेट सेक्रेटरी विकतो व तीं बहुतकरून एक्सचेंज बँका विकत घेतात. ही बिलें (अथवा यांना आपण हुंड्या असे म्हणू.) कलकत्ता, मुंबई व मद्रास येथे दाखवून रुपये घेतां येतात. त्यांच्या मोबदला इंग्लंडांत स्टेट सेक्रेटरी यास पौंड मिळतात. अशा रीतीने होमचार्जेस इकडून तिकडे पाठविण्याची व्यवस्था होते.

 अशा रीतीने सरकार हे मोठ्या प्रमाणावर बँकिंगचा धंदा करते असे अणण्यास हरकत नाही. तथापि यायोगाने मोठ्या बँकांशीं तें स्पर्धा करिते असें म्हणतां येत नाही. कारण लोकांशी प्रत्यक्ष व्यवहार सरकार करीत नाहीं. कौन्सिलबिलें नेहमी मोठाले हुंड्यांचे व्यापारी में एक्सचेंज बँका याच विकत घेतात. हिंदु