पान:रुपया.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ६७ ]

प्रसंग आल्यास या सोन्यांचा उपयोग लंडनमध्येच जास्त होईल. गेल्या दहा वर्षांत गोल्ड स्टैंडर्ड रिझर्व्ह' अतिशय मोठी झाला असल्यामुळे, ह्या विधानांत विशेष तथ्य राहिलें नाहीं. सोन्याचे चलन केल्यास, हा सर्वच प्रश्न बाजूला राहील. आतां इंपीरियल बैंक स्थापल्यामुळे नोटांच्या निधीचे स्थान बदलून सर्वच निधि हिंदुस्थानांत ठेवणे श्रेयस्कर झालेले आहे.

 नोटांचा निधि जर इंग्लंडमध्ये नेला नसता, तर त्यांतील रुपये व पौंड हिंदुस्थानांत कर्जाऊ देता आले असते व त्यापासून हिंदुस्थानच्या व्यापारास फायदा झाला असता. हिंदुस्थानांत उन्हाळ्याच्या महिन्यांत पैशाची तूट पडते व व्याजाचा दर अतिशय कडक होतो. असे असतां येथील नोटांच्या निधीचे पैसे सिक्यूरिटींच्या रूपांत इंग्लंडांमध्ये अडकविणे हे हिंदुस्थानच्या हितास विघातक आहे. सर जेम्स मेस्टन यांनी चेंबरलेन कमिशनपुढे साक्ष देतांना स्पष्ट म्हटले आहे, नोटांचा निधि हो विश्वासाने ठेविलेली ठेव ( Trust fund) असल्यामुळे त्यांतील कोणताही भाग व्याजी लावणे किंवा नोटा पटविण्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही कामी त्याचा व्यय करणे हे अन्यायाचे आहे.