पान:रुपया.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ६६ ]

फक्त ‘होमचार्जेस' पुरती बिले विकावीं. (याचे जास्त विवेचन प्रकरण ५ मध्ये केले आहे. )

 नोटांचा निधि लंडनमध्ये ठेवण्याविषयीं एक कारण सरकार तर्फे सांगण्यांत येते. ते असे हा निधि नुसता नोटांच्या चलनाकरितां नसून सुवर्णसंलग्नचलनाप्रमाणे हुंडणावळ स्थिर राखण्याकरितां याचा उपयोग होतो. यावर उत्तर असे आहे की, हुंडणावळ स्थिर राखण्याकरितां गोल्ड स्टैंडर्ड रिझर्व्ह' हा निधि असल्यामुळे, या दुसऱ्या निधीची आवश्यकता नाही. आवश्यकता आहे असे धरून चालले तरी, त्याला नोटांच्या चलनाचा निधि असे ह्मणणें हें निरर्थक आहे इंग्लंडांत असलेला निधि येथील नोटांचे संरक्षण कसे करणार ? तो निधि खर्च करून रुपे घेतले पाहिजे व ते हिंदुस्थानांत पाठवून टांकसाळींत त्याचे रुपये पाडले पाहिजेत. इतकें केल्यावर मग त्याचा येथे खऱ्या काय कडे उपयोग होणार. इतके होईपर्यंत बराच कालावधि लागतो. त्यांतूनही ह्या निधीत सिक्यूरिटी आहेत त्यांचा तर संकटसमयी मुळीच उपयोग होणार नाहीं. एकंदरीने हे धोरण चुकीचे आहे असे म्हणावे लागते.

 १९१४ मध्ये चेंबरलेन कमिशनने असा निकाल दिला की हुंडणावळ स्थिर ठेवण्याकरितां गोल्ड स्टैंडर्ड रिझर्व्ह हा अपुरी आहे व या कारणाकरितां नोटांच्या निधीमधील सोने इंग्लंडमध्य ठेवणे आवश्यक आहे. कारण रुपये घेऊन सोन्यावर हुंड्या देण्याचा