पान:रुपया.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ६३ ]

|

निधीतून रुपये देण्यास सांपडल्यास सोईचे असते; परंतु पूर्वीच्या कायद्याने या निधीतील रुपये, नोटा पढविण्याशिवाय दुसऱ्या कामाकरितां वापरता येत नाहीत. म्हणून १८९८ अक्ट २ हा कायदा पास करूने असे ठरविलें कीं, स्टेट सेक्रेटरीनें नोटांच्या निधींत तिकडे सोने अथवा सोन्याचे नाणे ठेविलें म्हणजे तितक्याच किंमतीचे रुपये येथील निधीतून देण्यास हरकत नाहीं. इंग्लंडांतील नोटांचा निधि व येथील निधि यांची एकंदर बेरीज कार्ययाप्रमाणे असली म्हणजे झाले. उदाहरणार्थ, स्टेट सेक्रेटरीने २५ कोटींची बिले विकलीं व येथील खजिन्यांत १५ कोटीच रुपये असले तर बाकीचे १० कोटि येथील नोटांच्या निधीतून द्यावे; व त्याच्या मोबदला त्याच किंमतीचे म्हणजे १० कोटींचे सोन किंवा सोन्याचे नाणे इंग्लंडांतील नोटांच्या निधीत जमा करावे. येथे १० कोटि (-) उणे झाले व इंग्लंडांत १० कोटि (+) अधिक झाले व एकंदर बेरीज कायम राहिली. यावर हिंदुस्थानच्या दृष्टीने आक्षेप असा आहे की, एकदां कौन्सिलबिलें जास्त विकण्याची चटक लागली ह्मणजे ती वाढत जाऊन हिंदुस्थानांतील निधि कमी होतो व इंग्लंडांतील निधि वाढत जातो. अशा रीतीची पद्धति ही दोषयुक्त आहे. व्यापारास मदत करणे हे स्टेट सेक्रेटरीचे काम नाहीं. लोकांस देणे असेल तर त्यांनी एक्स्चेंज बँकांच्या द्वारे हिंदुस्थानांत पैसे पाठवावे. स्टेट सेक्रेटरीचा या कृत्याशी अर्थाअर्थी कांही संबंध नाहीं. सेकेटरीनें