पान:रुपया.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ६४ ]

 या सर्व सूचना ग्राह्य आहेत; परंतु आमच्या मते नोटांच्या निधीचा कांहीं भाग इंग्लंडांत ठेवणे चुकीचे आहे. नोटांचा सर्व निधि हिंदुस्थानांतच असला पाहिजे. नोटा जर हिंदुस्थानांत तर निधि इंग्लंडांत कां ? हुंडणावळ हिंदुस्थानच्या विरुद्ध झाल्यास तेवढ्यापुरते एक कर्ज लंडनमध्ये काढून ‘उलट हुंड्या' विकाव्या परंतु तेवढ्याकरितां नोटांचा निधि नेहमीच लंडनमध्ये ठेवणे हे अगदीच अस्थानी आहे.

 इंग्लंडमध्ये जो नोटांचा निधि असतो, त्याचा व्यय कसा होतो व त्याची रचना कशी असते याचा तपशील असा आहे या निधीचा पुष्कळसा भाग हिंदुस्थानांत रुपये पाडण्याकरिता जे रुपे लागते, ते खरेदी करण्याकडे खर्च होतो. हे रुपें हें निधीचाच भाग असे समजले जाते. स्टेट सेक्रेटरीने वाटल्यास सोने किंवा सोन्याचे नाणे आपल्याजवळ ठेवावे किंवा ते नाणे हिंदु स्थानांत पाठवावे किंवा रुपे खरेदी करावे. हे रुपे अर्थातच हिंदु स्थानांत येऊन त्याचे रुपये पाडतात व ते येथील निधीमध्ये नंतर ज़मा करितात. पौंड किंवा रुपें इंग्लंडहून येथे प्रवास करताना म्हणजे आगबोटीवर असतांनाही ते निधीचा भाग आहे असे समजले जाते.

 स्टेट सेक्रेटरीने व्यापाराच्या साईकरितां कौन्लिलबिले विकल्यास, त्याचे रुपये येथे द्यावे लागतात. हे रुपये खजिन्यात नसल्यास किंवा तूट पडल्यास, नवीन रुपये न पाडतां, नोटांच्या