पान:रुपया.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[५९ ]

स्थानांत मंदीच्या मोसमांत लोक नोटांचा संचय करून ठेवतात. कारण रुपये किंवा पौंड जवळ ठेवणे हे धोक्याचे व खर्चाचे असते. तेजीच्या मोसमांत लोक नोटा घेण्यास खुषी नसतात. बहुतेक लोक रुपये मागतात. या कारणाने या मोमसांत एकंदर नोटांचे चलन जास्त होण्याऐवजी कमीच हाते ; म्हणजे लोक नोटा पटवून रुपये जमा करूं लागतात. त्यामुळे या मोसमांत सरकारी खजिने व करन्सी ऑफिसे यांवर सारखा मारा चाललेला असतो. हे रुपये नंतर शेतकरी, लहान व्यापारी यांच्या हातांत येतात. यामुळे नोटांची लोकप्रियता जरी वाढली आहे, ती सुद्धा नोटांपेक्षां रुपये जास्त पसंत करण्याची प्रवृति कमी झालेली नाहीं. या कारणामुळे रुपये व पौंड यांच्या निधीचा आकार कमी करणे हें अनिष्ट आहे.

 एक दोन वर्षांच्या आंकड्यांवरून ही गोष्ट स्पष्ट होईल.

 १९१०-११ मध्ये जूनपासून सप्टेंबरपर्यंत मंदीच्या मोसमांत लोकांजवळ अंदाजे ३७ कोटींच्या नोटा होत्या व सरकारी खजिन्यांत व सरकारी बँकांत मिळून ( प्रेसीडेन्सी बँकांना सरकारी बँका या नांवानेच आपण यापुढे संबोधन करूं.) अंदाजे २२ कोटींच्या नोटा होत्या व एकंदर चलन ५९ कोटि हे. आतां तेजीच्या मोसमांत ह्मणजे जानेवारीपासून मार्चपर्यंत लोकांजवळ ४१ कोटि नोटा होत्या व सरकारी खजिन्यांत व सरकारी बँकांत १३ कोटि होत्या व एकंदर चलन ५४ कोटि होते. सरकारी खजिन्यांतील