पान:रुपया.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ६० ]

९ कोटि नोटा कमी झाल्या; परंतु लोकांजवळ फक्त ४ कोटीच वाढल्या. अर्थात् बाकीच्या ५ कोटि नोटा पेपरकरन्सीमध्ये देऊन लोकांनीं रुपये घेतले. १९११-१२मध्ये मंदीच्या मोसमांत लोकांजवळ ३९ कोटि नोटा होत्या व खजिन्यांत व बँकांत २१ कोटि होत्या. नंतर तेजीच्या मोसमांत लोकांजवळ ४४ कोटि होत्या व खजिन्यांत व सरकारी बँकांत अदमासे ११ कोटि होत्या, ह्मणजे एकंदर चलन ६० कोटींचे ५५ कोटि झाले. कारण ५ कोटींच्या नोटा करन्सीऑफिसांन पटविण्याकरितां गेल्या. वरील दोन वर्षांच्या अनुभवावरून तेजीच्या दिवसांत सरकारास ५ पासून ८ कोटि रुपये जवळ ठेविलेच पाहिजेत असे सिद्ध होते.

 परंतु या आंकड्यांवरून एवढे सिद्ध होते कीं, व्यापाराच्या विस्तारसंकोचात नोटांचे कांहींच कार्य नाहीं असे जे पुष्कळांस वाटते, ते खोटे आहे. दिवसेंदिवस नोटा या जास्त परिचित होत चालल्या आहेत हे स्पष्ट आहे. वरील आंकड्यांत तेज़ीच्या मोसमांत दोनही वर्षी ४।५ कोटींच्या नोटा चलनांत जास्त आल्या असे दिसेल. त्यामुळे कांहीं कालाने व्यापाराच्या गरजा व निर्यात अशा मालाची देवघेव यांकरितां लागणाऱ्या चलनांत नोटांचा अधिक अधिक उपयोग होईल असे मानण्यास जागा आहे. नोटांचे चलन जास्त वाढल्यास, रुपयांवरचा ताण कमी होईल व कालांतराने रुपयांचे चलन कमी करण्यास सांपडेल.