पान:रुपया.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[ ५८ ]

आहे. कारण सिक्युरिटी ठेवल्यास व वेळेस कमी पडल्यास बदनामी होण्याचा संभव आहे व एकदा लोकांचा नोटांवर अविश्वास झाल्यास पुनः विश्वास उत्पन्न करणे दुरपास्त होईल.

 दुसरे मत असे आहे की व्यर्थ रुपये व पौंड साचवून ठेवणे हे अनुत्पादक असल्यामुळे जितक्या पैशांची जरूरी नाही तितके पैसे सिक्युरिरीटीत

घालून व्याजांचे उत्पन्न वाढवावे.

 वास्तविक हा प्रश्न सोडविण्यास गोल्ड स्टँडर्ड रिझर्व्ह व नोटांचा निधी यांचा खरोखरी उपयोग काय व त्यांचे हल्लीच्या पध्ततीत म्हणजे सुवर्ण संलग्न चलनांत काय कार्य आहे हे प्रथम ठरविले पाहिजे.ह्या प्रश्नांचा (प्रकरण ६ पहा ) पुढे विस्तृत रीतीने ऊहापोह केलेल्या आहे त्यामुळे या स्थळी नाही.

 पूर्वी नोटांचे चलन अतिशय थोड्या प्रमाणांत नोट पाठवण्याकरिता रोख नाणे ठेवणे जरूरी होते. त्या वेळेच्या स्थितीस अनुसरून नोटांचे सर्व कायदे केलेले आहेत.ते आज मित्तीस तसेच चालू देशांचे नुकसान होईल की काय हे पाहिले पाहिजे. नोट व रुपये यासंबंधाणने हिंदुस्तानात युरोपांतील देशांपेक्षा भिन्न स्थिति आहे. इतर देशांत तेजीच्या मोसमांत लोक नोटा जास्त मागतात व सर्व लोक नोट खुषीने घेतात त्यामुळे नाण्याची विशेष कोणी पर्वा करत नाही. मुख्य बॅंकेचे काम या मोसमात जास्त नोट काढणे हेच असते . हिंदू