पान:रुपया.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[५७ ]

 यावरून १९०६ नंतर सोन्याचा निधि इंग्लंडांत जास्त प्रमाणांत ठेवू लागले असे दिसून येईल. या निधींत सोने जमण्याचे कारण असे की, पौंड देऊन रुपये किंवा नोटा नेण्याची परवानगी दिल्यामुळे, लोकांकडून आलेले पौंड या निधींत साचू लागले. ७ कोटींच्या वर किंमतीचे पौंड या निधींत आल्याबरोबर ते चलनांत आणण्यास सरकारने सुरुवात केली हे पूर्वी सांगितलेच आहे.हे धोरण हितकर नाहीं असे वाटल्यावरून, चलनांत पौंड ठेवण्याचा नाद सोडून देऊन, ते केंद्रीभूत करण्यास सुरुवात झाली. नवीन धोरणास अनुसरून पौंड इंग्लंडांत ठेवण्याचे निश्चित केले व येथील बराचसा निधि इंग्लंडमध्ये नेला. हे पौंड बँक ऑफ इंलंडमध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेटच्या नांवावर अलग ठेविलेलेअसतात,

 १९०० पासून नोटांचे चलन जोराने वाढू लागले. लोकां मध्ये नोटांविषयीं विश्वासही जास्त उत्पन्न झाल्यामुळे, इतकें सोने ब रुपये में निधीमध्ये ठेवावे किंवा नाही हा प्रश्न उत्पन्न झाला आहे. चलनांत ५० कोटींच्या नोटा आहेत व यांपैकी २५ कोटींपेक्षा जास्त नोटांचे रुपये कोणीही मागत नाहीत. असे असल्यास, निधीमध्ये २०/२५ कोटींचे पौंड व रुपये व्यर्थ बिनव्याजीं कां ठेवावे अशा तऱ्हेचा हा प्रश्न आहे. यासंबंधाने दोन मते आहेत. एक मत असे आहे की, केव्हां कोण पैसे मागेल याचा नियम नसल्यामुळे, निधि धातूच्या रूपांत ठेवणे जरूर