पान:रुपया.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




प्रकरण ४ थें
कागदाचे चलन अथवा नोटा.

 नोटांचा मुख्य उद्देश असा आहे कीं, मोठ्या रकमेचे देणे देण्याकरितां रुपये जागोजाग न हालवितां, सोईकर व हलक्या वजनाचें असें चलन अस्तित्वात आणणे. कल्पना करा की, सरकारास एखाद्या नोकरास किंवा व्यापाऱ्यास १००० रुपये देणे आहे. हे रुपये एका सुरक्षित ठिकाणी ठेवून सरकारने त्याला नोट दिली. त्याने ती नोट आपल्या एका धनकोस दिली; त्या ती कापूस खरेदी करून एखाद्या शेतकऱ्यास दिली व त्याने त जमिनीचा सारा देण्याऐवजी फिरून सरकारजवळ दिली. आता ती नोट परत आल्यामुळे, रुपये जागचे न हालतां सरकारचे देणे व सरकारचे येणे यांची रमारमी झाली. अशाच रीतीने जास्त मनुष्यांच्या हातांत ती नोट खेळल्यास विशेष त्रास न होता, सर्वांचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालू शकतो.

 परंतु हे सर्व निर्विघ्न पार पडण्यास, त्या नोटांबद्दल केव्हाही रुपये मिळू शकतील असा सर्वांचा पूर्ण विश्वास पाहिजे. याच कारणाकारतां कागदी चलनास विश्वासजनित चलन असे सार्थ नाव दिलेले आहे. सरकारी कायद्याप्रमाणे नोट हे कायदेशीर फेडीच चलन आहे. म्हणजे कोणत्याही धनकोस नोट घेणे हे भाग